SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 38
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ खऱ्या देव , गुरू, शास्त्र व धर्माचा परिचय होतच नाही. उलट , आपल्या विपरीत समाजाच्या आहारी जाऊन अतत्त्वश्रद्धान करतो, तेच गृहीत (आधिगमज) मिथ्यादर्शन होय. परंतु, जे मिथ्यात्व मागील संस्कारामुळे निसर्गतःच प्राप्त होते , त्यास अगृहीत मिथ्यात्व म्हणतात . हे मिथ्यात्त्व परोपदेशाशिवाय इंद्रियासोबत तृष्णा आणि कषायामध्ये जी प्रकृती असते ; त्या प्रकृतीलाच अगृहीत (निसर्गज) मिथ्यात्व म्हणतात . जीवतत्त्वाचे स्वरूप व भेद : जीवतत्त्वाचे तीन प्रकार आहेत . गती, इंद्रिय इत्यादिकांच्या अपेक्षेने भेद न करता अंतरंग श्रद्धा व तत्स्वरूप साक्षात परिणाम या अपेक्षेने हे तीन भेद केले आहेत . १) बहिरात्मा , २) अंतरात्मा, ३) परमात्मा . १) बहिरात्मा : जो शरीरादी बाह्य पदार्थांमध्ये आत्मबुद्धी करतो , तो बहिरात्मा होय. त्याला जीव-अजीवाचे , स्व-पराचे भेदज्ञान नसते . तो अविवेकी असतो. तो फक्त बाह्य जग जे दिसते , त्यास खरे मानतो. २) अंतरात्मा : जो आपल्या भेदविज्ञानाद्वारे आत्मस्वरूपाला शरीरादी सर्व परद्रव्यांपासून व विकारांपासून भिन्न मानतो, तो अंतरात्मा होय. अंतरात्मे हे तीन प्रकारचे आहेत . १) उत्तम : जसे मुनिराज जे आपल्या शुद्ध आत्मस्वरूपात लीन असतात . २) मध्यम : जे देशव्रती, १२ व्रते व ११ प्रतिमा पाळणारे पाचव्या गुणस्थानातील श्रावक आहेत , ते मध्यम अंतरात्मा आहेत. ३) जे अविरत आहेत, ते जघन्य अंतरात्मा आहे. हे तीन अंतरात्मे मोक्षमार्गामध्ये विहार करणारे आहेत. ३) परमात्मा : ज्याने आपल्या आत्म्याची पूर्णतः शुद्धी केली व ज्यास जन्ममरण नाही, असा तो परमात्मा. अनंत वीर्य , अनंत दर्शन , अनंत सुख, अनंत ज्ञानाने परिपूर्ण तो परमात्मा होय . जैन धर्माची ओळख / २७ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001594
Book TitleJain Dharmachi Olakh
Original Sutra AuthorN/A
AuthorVijaya Gosavi
PublisherSumeru Prakashan Mumbai
Publication Year2008
Total Pages98
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Religion, & Articles
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy