________________
पैशांचा व्यवहार
किती जास्त होणार? म्हणून आपण त्याच्याकडे पैसे परत मागायला हवे. ज्यामुळे तो बिचारा इतक्या मोठ्या जोखीमेत तर अडकणार नाही! पण जर तो द्यायला तयारच नसेल आणि जोखीम पत्करत असेल तर त्याला जबाबदार आपण नाही.
प्रश्नकर्ता : निसर्गाच्या व्याजाचा दर काय आहे ?
दादाश्री : नॅचरल इन्टरेस्ट इज वन परसेन्ट एन्युअली. म्हणजे शंभर रुपयावर एक रुपया वार्षिक! जर तो तीनशे रुपये परत करू शकला नाही, तर हरकत नाही. आपण म्हणावे की मी आणि तू आपण दोघे मित्र. आपण एकत्र पत्ते खेळू. कारण आपली रक्कम काही जाणार तर नाही ना! हा निसर्ग इतका करेक्ट(अचूक) आहे की तुमचा एक केस जरी चोरला असेल, तरी तो कुठेही जाणार नाही. निसर्ग अगदी करेक्ट असतो. परमाणू परमाणूपर्यंतचा हिशोब करेक्टच असतो. म्हणून या जगात वकील करण्यासारखे नाही. मला चोर भेटतील, लुटारु भेटतील अशी भीती बाळगण्याचेही कारण नाही. हे तर वर्तमानपत्रात येते की आज अमक्याला गाडीतून खाली उतरवून त्याचे दागिने लुटले, अमक्याला मोटारीत डांबून मारले आणि पैसे हिसकावून घेतले. 'मग आता सोन्याचे दागिने अंगावर घालायचे की नाही घालायचे?' डोन्ट वरी! करोडो रुपयांची रत्ने धारण करून फिरलात तरीही तुम्हाला कुणी हात लावू शकणार नाही. असे हे जग आहे. आणि ते अगदी करेक्ट आहे. जर तुमची जोखीमदारी असेल तरच तुम्हाला हात लावेल. म्हणूनच आम्ही सांगतो की तुमचा वरिष्ठ कोणीही नाही. तेव्हा, 'डोन्ट वरी!' (चिंता करू नका) निर्भय व्हा!
धंद्यामध्ये बिनहक्काचे अजिबात नसावे. आणि ज्या दिवशी बिनबहक्काचे घेतले जाईल, त्या दिवसापासून धंद्यात बरकत होणार नाही. देव यात हस्तक्षेप करीतच नाही. धंद्यात तर तुझी हुशारी आणि नीतिमत्ता हे दोनच कामास येतात. अनैतिक धंद्यात वर्ष-दोन वर्ष चांगली कमाई होईल परंतु नंतर मात्र नुकसान होईल. खोटे कार्य घडले तर शेवटी त्याचा पश्चाताप केला तरी सुटाल. व्यवहाराचे सार काही असेल, तर ते नीतिमत्ताच आहे. पैसे थोडे कमी असतील पण नीतिमत्ता असेल तरीही तुम्हाला शांती वाटेल. आणि जर नीति नसेल तर भरपूर पैसे असूनही