________________
त्यांनी शिष्य केले आहेत की नाही? ज्ञानी पुरुष स्वतः कोणत्या पदी वर्तत आहेत, इत्यादी सर्वच प्रश्नांची संपूर्ण समाधान देणारी उत्तरे पूज्य दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेल्या वाणीद्वारे मिळतात!
सामान्य समजुतीप्रमाणे गुरू, सद्गुरू व ज्ञानी पुरुष या तिघांना एकसारखेच मानले जाते परंतु येथे त्या तिघांमधील भेदाचे तंतोतंत स्पष्टीकरण सापडते.
अध्यात्माचा मार्ग मार्गदर्शकाशिवाय कसा पार करता येईल? तो मार्गदर्शक अर्थात गाईड म्हणजेच...
मोक्ष मार्गस्य नेत्तारम् भेत्तारम् सर्व कर्माणाम्
ज्ञातारम् सर्व तत्वानाम् तस्मै श्री सद्गुरू नमः एवढ्यातच मोक्षमार्गाचे नेता, गुरू कसे असावेत हे सर्व समजून येते.
गुरू आणि शिष्य दोघांनाही कल्याणाच्या मार्गावर प्रयाण करता येईल यासाठी सर्व दृष्टीकोनातून गुरू-शिष्याच्या अन्योन्य संबंधाची समज, लघुत्तम तरी सुद्धा अभेद, अशा उच्च पदावर विहार करणाऱ्या ज्ञानी पुरुषाच्या वाणीद्वारे प्रकाशमान झाली, ती येथे संकलित झाली आहे, जी मोक्षमार्गावर चालणाऱ्या पथिकांसाठी मार्गदर्शक (गुरू) ठरेल.
- डॉ. नीरूबहन अमीन