________________
गुरु-शिष्य
१२९
बिझनेसमध्ये (व्यापारात) पडले आहेत. त्यांना स्वतःची पूजा करवून फायदा मिळवायचा आहे. हो, आणि अशी दुकाने तर आपल्या हिंदुस्तानात पुष्कळ आहेत. अशी काय दोन-तीन दुकानेच आहेत? अशी तर अपार दुकाने आहेत. आता त्या दुकानदाराला आम्ही असे कसे सांगू शकतो? तो म्हणतो की 'मला दुकान सुरु करायचे आहे' तर आम्ही त्यांना नाही सुद्धा कसे म्हणणार? मग ग्राहकांचे आम्ही काय केले पाहिजे?
प्रश्नकर्ता : त्यांना थांबवले पाहिजे.
दादाश्री : नाही, नाही थांबवू शकत. या जगात असे सर्व तर चालतच राहणार.
प्रश्नकर्ता : आता तर करोडो रुपये जमवून आश्रम बनवतात आणि लोक त्याच्याच मागे लागले आहेत!
दादाश्री : परंतु हे रुपये सुद्धा असचे आहेत ना! रुपयात काही बरकतच नाही म्हणून.
प्रश्नकर्ता : परंतु त्या लक्ष्मीचा योग्य मार्गाने उपयोग केला, शिक्षणाच्या कामासाठी वापरले किंवा कुठल्या उपयोगी सेवेमध्ये वापरले तर? ___ दादाश्री : तसे खर्च होतील, पण तरीही माझे म्हणणे असे आहे की त्यात भगवंताला काही पोहोचत नाही. ते चांगल्या मार्गाने खर्च झाले, तर त्यातले थोडेसे जरी शेतात गेले तर पुष्कळ उपजेल. परंतु त्यात त्याला काय लाभ झाला? बाकी, जिथे लक्ष्मी असते तिथे धर्म नसतो. जिथे जितकी लक्ष्मी आहे, तेवढाच तिथे धर्म कच्चा आहे!
प्रश्नकर्ता : लक्ष्मी आली म्हणून मग लक्ष्मी मागे लक्ष ठेवावे लागते, व्यवस्था करावी लागते.
दादाश्री : नाही, असे नाही. त्याच्या व्यवस्थेसाठी नाही, लोक म्हणतील की व्यवस्था तर आम्ही करू, परंतु जिथे लक्ष्मीची हजेरी आहे, तिथे धर्म तेवढा कच्चा राहतो! कारण सगळ्यात मोठी माया, लक्ष्मी आणि