________________
७८
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
जागृतीमुळे स्वत:चे सर्व दोष, सर्वच दिसते. समोरच्या व्यक्तीचे दोष पाहणे म्हणजे जागृती नाही. असे तर अज्ञानीला खूप होत असते. दुसऱ्याचे दोष अजिबात दिसत नाहीत आणि स्वतःचे दोष पाहण्यात वेळही अपूरा पडतो. त्याचेच नाव जागृती.
म्हणजे झाले ज्ञानी प्रश्नकर्ता : जितके विभाव होतात ते सर्व दोषच म्हटले जातात ना?
दादाश्री : आता विभाव होतच नाही. आता जे दोष दिसतात ना, ते मानसिक दोष दिसतात. मनःपर्यवमुळे मानसिक दोष, बुद्धीचे दोष, अहंकाराचे दोष अर्थात अंत:करणातील सर्व दोष तुम्हाला दिसतात. चंदुभाऊचे (स्वतःचे) दोष तुम्हाला दिसतात की नाही?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : चंदुभाऊचे दोष तुम्हाला दिसले म्हणजे तुम्ही झाले ज्ञानी. हे तर तुम्ही मला जेमतेम दहा तासच भेटले असाल.
तुमच्या हातात, ज्या हिऱ्याची किंमत सुद्धा मोजता येणार नाही असा हिरा मी तुमच्या हातात ठेवला आहे. पण तो हिरा बाळाच्या हातात आल्यामुळे त्याची व्हॅल्यू समजतच नाही!
दिसतो धबधबा दोषाचा... क्षणोक्षणी दोष दिसतात ना? प्रश्नकर्ता : क्षणोक्षणी तर नाही, पण थोडे-थोडे दिसतात.
दादाश्री : अजून तर क्षणोक्षणी दिसतील. खूप दोष आहेत, अपार दोष आहेत, पण अजून दिसत नाहीत. स्वतःचे दहा दोषीही कोणाला दिसत नाहीत. दोन-तीन दोष असतील असे बोलतात, कारण दोष दिसू लागले तेव्हापासूनच मोक्षाला जाण्याची सुरुवात होते.