________________
२६
अहिंसा
(पाप) स्पर्श करणार नाही. कारण 'स्वतः' 'शुध्दात्मा' आहे. आणि
औषध मारणारा कोण? तर 'चंदुभाऊ' आहे. आणि तुम्हाला जर दया येत असेल तर मग 'तुम्ही' चंदुभाऊ व्हाल.
प्रश्नकर्ता : असे औषध तयार केल्याने, विकल्याने, खरेदी केल्याने, पिकांवर फवारल्याने त्याला कर्माचे बंधन होते की नाही?
दादाश्री : हो, ज्यांचे औषध तयार करण्याचे कारखाने आहेत ते सर्वच मला विचारतात की, 'दादा, आता आमचे काय होईल?' मी सांगितले, 'माझ्या सांगण्याप्रमाणे वागाल तर काहीही होणार नाही.'
प्रश्नकर्ता : म्हणजे याचा अर्थ असा झाला की, शुद्धात्मा भावाने हिंसा करू शकतो ना?
दादाश्री : हिंसा करण्याची गोष्टच नाही. शुद्धात्मा भावात हिंसा होतच नसते. करायचे काहीच नसते ना!
प्रश्नकर्ता : मग आचारसंहितेच्या दृष्टीने दोष म्हटला जाणार नाही?
दादाश्री : आचारसंहितेच्या दृष्टीने दोष म्हटला जाणार नाही. आचार-संहिता केव्हा असते? जोपर्यंत तुम्ही चंदुभाऊ आहात तोपर्यंत आचारसंहिता असते. मग त्या दृष्टीने दोषच म्हटला जाईल. परंतु आता या 'ज्ञानानंतर' तुम्ही चंदुभाऊ राहिले नाहीत, तर तुम्ही आता शुद्धात्मा झालात आणि ते तुमच्या लक्षातच असते. 'मी शुद्धात्मा आहे.' हे निरंतर लक्षात राहणे यास शुक्लध्यान म्हणतात. 'मी चंदुभाऊ आहे' हे अहंकाराचे ध्यान आहे.
आपले इतके सगळे महात्मा आहेत, पण कोणीही दुरुपयोग केलेला नाही. ते या संदर्भात मला विचारतात की, 'आम्ही, हा धंदा बंद करु का?' मी सांगितले, 'नाही, धंदा आपणहून बंद होत असेल तर होऊ द्या आणि बंद होत नसेल तर सुरु राहू द्या.