SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 27
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ अहिंसा दादाश्री : असे आहे ना, त्या सरमुख्यताराने बॉम्बगोळा फेकला, त्याच्यात आणि तुझ्यात काय फरक ? तू तर त्यांच्यातलाच छोटा सरमुख्यतार झालास ! १६ प्रश्नकर्ता : पण ही तर गावची गोष्ट झाली ना ! पावसाळ्यात तर सगळीकडे घाण असतेच. त्यामुळे सगळीकडेच मच्छर, माश्या वगैरे होतात. म्हणून मग म्युनिसिपालिटीवाले काय करतात की सगळीकडे औषध फवारतात. दादाश्री : म्युनिसिपालिटीवाले करतात, त्यात आपल्याला काय घेणेदेणे ? आपल्या मनात मात्र असे भाव असायला नको. आपल्या मनात तर असेच असायला हवे की असे नसेल तर बरे. प्रश्नकर्ता : तर मग म्युनिसिपालिटीची काम करणारी जी माणसे आहेत, जी सत्तेवर असतात, त्यांना दोष लागतो का ? दादाश्री : नाही, त्यांनाही दोष लागत नाही. प्रश्नकर्ता : मग कोणाला दोष लागतो ? दादाश्री : ते तर फक्त करणारेच आहेत. त्यांच्याकडून हे काम कोण करवून घेतात ? तर त्यांचा वरिष्ठ अधिकारी वर्ग. प्रश्नकर्ता : मग वरिष्ठ अधिकारी कोणासाठी करतात ? दादाश्री : त्यांचे कर्तव्य म्हणून करतात ! स्वतःसाठी करत नाहीत. प्रश्नकर्ता : पण आपण तर तक्रार केली, पत्र लिहून नोटिस दिली. दादाश्री : पण ज्यांना नाकारायचे असेल ते नाकारु शकतात. ज्यांना करायचे नसेल ते म्हणतील, 'की भाऊ, मला हे नको. मला हे आवडत नाही'. मग काय ? मग स्वतःची जबाबदारी नाही. पण ज्यांना आवडते त्यांची जबाबदारी.
SR No.034320
Book TitleNon Violence Ahimsa (Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year
Total Pages128
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy