________________
अहिंसा
स्वतःहून उभे केलेले तप कशाला करता ? समोर येऊन ठेपलेले तप करा ना! समोर आलेले तप हे प्रत्यक्ष मोक्षाचे कारण आहे आणि तुम्ही स्वतःहून उभे केलेले तप हे संसाराचे कारण आहे.
७
प्रश्नकर्ता : हो, खूपच मजेदार गोष्ट सांगितली. आम्ही ओढवून घेतलेले तप करत असतो, त्यापेक्षा तर हे जे येऊन ठेपलेले तप आहे ते होऊ द्यायचे.
दादाश्री : हो, ते तप तर ओढवून घतलेले असते आणि हे तर प्राप्त तप आहे, समोरून सहजपणे आलेले ! आपण काही सर्व ढेकणांना बोलवायला जात नाही. जेवढे ढेकूण आले असतील तेवढ्यांनी आरामशीर जेवावे. ‘तुमचेच घर आहे.' मग त्यांना खाऊ घालूनच पाठवावे.
मातेने संस्कार दिले अहिंसा धर्माचे
माझी आई माझ्यापेक्षा छत्तीस वर्षांनी मोठी होती. मी तिला विचारले की, ‘घरात ढेकूण झाले आहेत ते तुला चावत नाहीत का ?' तेव्हा आई म्हणाली, ‘बेटा, चावतात तर खरे. पण ते दुसऱ्यांसारखे टिफिन थोडेच घेऊन येतात, की 'आम्हाला, द्या माय-बाप ?' ते बिचारे सोबत भांडे घेऊन येत नाहीत आणि त्यांचे खाऊन झाल्यावर निघूनही जातात ! ' मी म्हणालो, धन्य आहे अशा मातेला ! आणि या मुलालाही धन्य आहे !
मी जर कोणाला दगड मारून आलो असेल ना, तर आई मला काय म्हणायची?' अरे, त्याचे रक्त निघेल. त्या बिचाऱ्याची आई नाही, मग कोण औषधपाणी करेल ? आणि तुझ्यासाठी तर मी आहे. तू मार खाऊन येत जा, मी तुझी मलमपट्टी करेन. तू स्वतः मार खाऊन ये पण (दुसऱ्यांना) मारून येऊ नकोस.' बोला आता, अशी आई आपल्या मुलाला महावीर बनवणार की नाही ?
प्रश्नकर्ता : सध्या तर याहून उलटच चालले आहे. आज तर म्हणतील, बघ हं, मार खाऊन आलास तर !