________________
व्यवहार आणि धर्म शिकविले जगाला __ एक पुस्तक व्यवहार ज्ञानाचे तयार करा. लोकांचा व्यवहार जरी सुधारला ना, तरी फार झाले. आणि माझे शब्द आहेत तेव्हा त्यांचे मन परिवर्तन होईल. शब्द माझेच ठेवा. शब्दात बदल करु नका. वचनबळ असलेले शब्द आहेत. मालकी नसलेले शब्द आहेत. शब्दांची सुव्यवस्थित मांडणी तुम्ही करा.
माझे हे जे व्यवहारीक ज्ञान आहे ना, ते तर ऑल ऑवर वर्ल्डमध्ये प्रत्येकाला उपयोगी पडेल. संपूर्ण मनुष्यजातिला उपयोगी पडेल.
आमचा व्यवहार सर्वोच्य प्रकारचा होता. तो व्यवहार पण शिकवतो आणि धर्म पण शिकवतो. स्थूलवाल्याला स्थूल आणि सूक्ष्मवाल्याला सूक्ष्म, परंतु प्रत्येकालाच उपयोगी पडेल. म्हणून असे काही करा की प्रत्येकाला मदतरुप होईल. लोकांना मदत होईल अशी बरीच पुस्तके मी वाचली पण त्यात काही भले होईल असे नव्हते. थोडीफार मदत होऊ शकते परंतु जीवन सुधारतील असे तर नसतातच ना! कारण ते तर डॉक्टर ऑफ माईन्ड, मनाचे डॉक्टर असतील तरच होईल! तर, आई एम द फुल डॉक्टर ऑफ माईन्ड.
- दादाश्री