SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 22
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ सेवा-परोपकार 13 शेवटी उपकार स्वतःवरच करायचे नेहमी कोणावर तरी उपकार केले असतील, कोणाचा फायदा केला असेल, कोणासाठी जगला असाल तर त्याचा लाभ तुम्हाला होतो, पण तो भौतिक लाभ होतो, आणि त्याचे फळ भौतिक स्वरूपातच मिळते. प्रश्नकर्ता : कोणावर उपकार करण्यापेक्षा स्वत:वरच उपकार केले तर? दादाश्री : बस, स्वत:वर उपकार करण्यासाठीच सर्व करायचे आहे. जो स्वत:वर उपकार करेल त्याचे कल्याण होईल. परंतु त्यासाठी त्याला स्वतःला (स्वत:च्या आत्म्याला) जाणून घ्यावे लागेल, तोपर्यंत इतरांवर उपकार करत राहा, त्याचे भौतिक फळ मिळत राहिल. आपल्याला स्वत:ची ओळख होण्यासाठी 'मी कोण आहे' हे जाणून घ्यावे लागेल. वास्तविक आपण स्वतः शुद्धात्मा आहोत. तुम्ही तर आजपर्यंत 'मी चंदुभाऊ आहे' एवढेच जाणत होतात ना की अजून दुसरे काही जाणता? हा 'चकुंभाऊ' तो 'मीच आहे.' असेच म्हणाल. हिचा नवरा आहे, याचा मामा आहे, याचा काका आहे, अशी सर्व घटमाळ! असेच आहे ना? हेच ज्ञान आहे ना तुमच्याकडे ? त्याहून पुढे गेला नाही ना? मानवसेवा, सामाजिक धर्म | प्रश्नकर्ता : पण व्यवहारात असे होते ना की कोणासाठी दयाभाव राहतो, सेवा राहते, कोणासाठी भावना राहते की काहीतरी करावे. कोणाला तरी नोकरी मिळवून द्यावी, आजारी व्यक्तिला होस्पिटलमध्ये भरती करावे म्हणजे ह्या सर्व क्रिया एक प्रकारे व्यवहार धर्मच झाला ना? दादाश्री : ही सर्व सामान्य कर्तव्ये आहेत. प्रश्नकर्ता : तर मानवसेवा ही एक प्रकारे व्यावहारिक झाले असे समजायचे ना? तो तर व्यवहारधर्म झाला ना? दादाश्री : हा व्यवहार धर्म पण नाही, हा तर समाजधर्म म्हटला जातो. ज्या समाजाला जे अनुकूल असेल ते त्या लोकांना अनुकूल वाटते
SR No.034046
Book TitleRight Understanding To Helping Others Benevolence Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2018
Total Pages50
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy