SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 10
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ काय काय पोहोचते ? हे सगळे करायला हवे की नको? मृत्यूनंतर गतीची स्थिति, इ. सर्व खुलासे इथे स्पष्ट होतात. अशी भयभीत करणारी मृत्यूची रहस्ये जेव्हा उलगडतात तेव्हा मनुष्याला त्याच्या जीवनकाळातील व्यवहारात येणाऱ्या अशा प्रसंगी निश्चतच सांत्वना प्राप्त होते. 'ज्ञानीपुरुष' म्हणजे जे देहापासून, देहाच्या सर्व अवस्थांपासून, जन्मापासून, मृत्यूपासून वेगळेच राहिले आहेत. त्याचे ते निरंतर ज्ञाता-दृष्टा राहतात, आणि अजन्म-अमर आत्म्याच्या अनुभव दशेत राहतात ते! जीवनाच्या आधी, जीवनानंतर आणि देहाच्या अंतिम अवस्थेत, अजन्म - अमर अशा आत्म्याच्या स्थितीची हकीगत काय आहे, हे ज्ञानीपुरुष ज्ञानदृष्टीने अगदी स्पष्टपणे सांगतात. आत्मा तर सदैव जन्म - मृत्यूपासून मुक्तच आहे, केवळज्ञान स्वरूपच आहे. केवळ ज्ञाता - दृष्टाच आहे. जन्म - मृत्यू हे आत्म्याला नाहीच. तरीसुद्धा बुद्धीनेच जन्म मृत्यूच्या परंपरेचे सर्जन होत राहते, जी मनुष्याला अनुभवात येते. तेव्हा स्वाभाविकपणे मूळ प्रश्न समोर येतो की जन्म-मृत्यू कोणत्या प्रकारे होत असतात ? त्यावेळेस आत्मा आणि त्या सोबत कोण-कोणत्या वस्तू असतात ? त्या सगळयांचे काय होते ? पुनर्जन्म कोणाचा होतो? कसा होतो ? आवागमन कोणाचे असते ? कार्यामधून कारण आणि कारणांमधून कार्याची परंपरा यांचे सर्जन कसे होते? ते कसे काय थांबू शकेल ? आयुष्याचे बंध कोणात्या प्रकारे पडतात ? आयुष्य कोणत्या आधारावर निश्चित होते ? अशा सनातन प्रश्नांची सचोट-समाधानकारक, वैज्ञानिक समज ज्ञानीपुरुषांशिवाय कोण देऊ शकणार ? आणि त्याहीपुढे, गतीमध्ये प्रवेश करण्याचे कायदे कोणते असतील ? आत्महत्येचे कारण आणि परिणाम काय ? प्रेतयोनी काय असेल ? भूतयोनी आहे का ? क्षेत्र परिवर्तनाचे नियम कोणते ? भिन्न-भिन्न गतींचा आधार
SR No.034044
Book TitleDeath Before During and After Marathi
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2018
Total Pages62
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy