________________
प्रतिक्रमण
खोट्या मनाने माफी मागत असेल ते पण चालवून घेऊ. पण माफी मागायची.
प्रश्नकर्ता : तर मग त्याला सवय पडून जाईल?
दादाश्री : सवय पडून जाईल तर भले पडून जावो. पण माफी मागायची. माफी नाही मागीतली तर उपाधि आलीच समजा!!! माफीचा अर्थ काय? तर याला प्रतिक्रमण म्हणतात आणि दोषाला काय म्हणाल? अतिक्रमण.
कोणी ब्रांडी पीतो आहे आणि म्हणतो मी माफी मागतो. तर मी सांगणार माफी मागत जा. माफी मागत जा, आणि पीत जा, पण मनात नक्की कर मला आता सोडून द्यायची आहे. हृदयापासून मनात नक्की करायचे. मला सोडून द्यायची आहे. मग पीत जा आणि माफी मागत जा. एकाद दिवशी त्याचा अंत येणार. हे माझे विज्ञान शंभर टक्याचे आहे.
हे तर विज्ञान आहे!! उगवल्या शिवाय राहणार नाही. त्वरितच फल देणारे आहे. 'धीस इज द कॅश बँक ऑफ डिव्हाइन सोल्युशन' (ही दिव्य परिणाम देणारी रोकड बँक आहे) कॅश बँक हीच! दहा लाख वर्षापासून निघालीच नाही! दोन तासात मोक्ष घेऊन जावे !! येथे तू जे मागणार ते द्यायला तयार आहे. मागणारा चुकतो.
एका माणसाला चोरी केल्यानंतर पश्चाताप होतो, तर त्याला निसर्ग सोडून देते. पश्चाताप केला त्याला भगवंताकडे गुन्हा नाही. परंतु जगातले लोक दंड करतील ते त्याला या जन्मातच भोगावे लागेल.
हे सर्व चुकीचे आहे, असे नाही करायला पाहिजे, असे सर्व बोलतात, ते वरकरणी बोलत असतात 'सुपरफ्लुअस' बोलत असतात. हार्टिली नाही बोलत, बाकी जर असे हार्टिली बोलला तर काही काळानंतर त्या दोषांपासून सुटका होईल च! तुमचे कितीही खराब दोष होवो पण त्याचा तुम्हाला खूप हार्टिली पश्चाताप झाला तर तो दोष पुन्हा नाही होणार. आणि पुन्हा झाला तरी त्याची हरकत नाही, पण पश्चाताप खूप करीत रहा.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण आणि पश्चाताप ह्यात फरक काय?