________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
५५
प्रश्नकर्ता : अर्थात् ज्ञान झाल्यानंतर त्यांना ओळखले.
दादाश्री : हो, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ओळखूच शकलो. नाहीतर ओळखूच शकलो नसतो, मनुष्य ओळखू शकत नाही. मनुष्य स्वतःलाच ओळखू शकत नाही की, मी कसा आहे! अर्थात एकमेकांना ओळखतो, ह्या वाक्यात काहीही तथ्य नाही. आणि पसंद करण्यात चूकही झालेली नाही.
प्रश्नकर्ता : हे समजवा की ओळखायचे कसे? पती ने आपल्या पत्नीला हळू हळू, सूक्ष्मपणे, प्रेमाने कसे ओळखावे, हे समजववा.
दादाश्री : ओळखाल केव्हा? एकतर समानतेची संधी द्याल तेव्हा. त्यांनाही स्पेस (मोकळीक) दिली पाहिजे. जसे सोंगट्याने बाजी खेळायला समोरासमोर बसतो, तेव्हा समोरच्याला पण खेळायची समान संधी (डाव) दिली पाहिजे. तरच खेळण्याची मजा येते. पण हे तर समान संधी कसली देतात? आम्ही देतो समान संधी.
प्रश्नकर्ता : आपण समानतेची संधी कशाप्रकारे देता? पॅक्टिकली कशाप्रकारे देता?
दादाश्री : मनाने त्यांना वेगळे समजू देत नाही. ती उलट-सुलट बोलली तरीपण समान आहोत अशाप्रकारे, अर्थात मी दबाव घालत नाही.
अर्थात् समोरच्याची प्रकृती ओळखायची की, ही प्रकृती अशी, अशी आहे. नंतर मग दुसऱ्या काही पद्धती शोधून काढाव्या. मी लोकांकडून दुसऱ्या पद्धतीने काम नाही घेत का? मी सांगितलेले सर्व करतात की नाही? करतात. कारण माझ्यात तसे कौशल्य होते म्हणून नाही, पण मी दुसऱ्या पद्धतीने काम घेतो, म्हणून.
घरात बसणे आवडत नसेल, तरी पण असे बोला की, तुझ्याशिवाय मला करमत नाही! तेव्हा ती पण म्हणेल की तुमच्या शिवाय मला पण करमत नाही. तर मोक्षाला जाऊ शकाल. आता तर दादा भेटले आहेत ना, तर मोक्षाला जाता येईल.
प्रश्नकर्ता : तुम्ही हीराबांना असे बोलता का ?