SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 81
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ कर्माचे विज्ञान दादाश्री : नाही, हे सर्व कर्माच्या उदयाच्या आधारावर आहे. सर्वजण उदय भोगत आहेत. मनुष्यांची वृद्धि होत असेल तरीही भूकंप होत राहतील. जर हानि-वृद्धिच्या आधारावर अवलंबून असेल तर होणार नाही ना? प्रश्नकर्ता : म्हणजे ज्याला भोगायचे आहे त्याचा उदय का? दादाश्री : मनुष्याचा उदय, प्राण्यांचा, सर्वांचाच. होय, सामूहिक उदय येतो. पहा ना, हिरोशिमा आणि नागासाकीचा उदय आला होता ना! प्रश्नकर्ता : ज्याप्रमाणे एका व्यक्तीने पाप केले, त्याप्रमाणे सामूहिक पाप केले तर त्याचा बदला सामूहिक रित्या मिळतो का? एक व्यक्ति स्वतः एकटा चोरी करण्यास गेला आणि दहा व्यक्ति सोबत दरोडा टाकायला गेले, तर त्याचा दंड सामूहिक मिळत असेल का? दादाश्री : होय. फळ संपूर्ण मिळेल, पण दहाही लोकांना कमीजास्त प्रमाणात. त्यांचे कसे भाव आहेत त्याआधारावर. एखादी व्यक्ति तर असे म्हणत असेल की या माझ्या काकांच्या घरी मला नाईलाजाने जावे लागले, असे त्याचे भाव असेल. म्हणजे जितका स्ट्राँग (मजबूत) भाव आहे, त्यानुसार सर्व हिशोब फेडायचे आहेत. अगदी करेक्ट. धर्मकाट्यासारखे. प्रश्नकर्ता : पण जे हे नैसर्गिक कोप होत असतील, जसे की एखाद्या ठिकाणी विमान कोसळले आणि इतके जण मारले गेले, तसेच एखाद्या ठिकाणी ज्वालामुखी फुटला आणि दोन हजार लोक मृत्यु पावले. हे त्या सर्वांनी सोबत केलेल्या कर्मांच्या सामूहिक दंडाचा परिणाम असेल का? दादाश्री : त्या सर्वांचा हिशोब आहे सगळा. फक्त हिशोबवाले त्यात पकडले जातात, दुसरा कोणीही पकडला जात नाही. आज इथून मुंबईला गेला असेल आणि दुसऱ्या दिवशी इथे भूकंप होईल आणि मुंबईवाले तिथून इथे आलेले असतील. ते मुंबईवाले इथे मरून जातात, म्हणजे असा सर्व हिशोब आहे. प्रश्नकर्ता : म्हणजे आता जे इतके सर्व लोक जिथे-तिथे मरत
SR No.030119
Book TitleKarmache Vignan
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2011
Total Pages94
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy