SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 62
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ कर्माचे विज्ञान घरात एक माठ असतो, तो जर मुलाने फोडला तर कोणी क्लेश करत नाही आणि काचेचे एवढे छोटेसे भांडे असेल, ते जर फोडून टाकले तर? नवरा काय म्हणतो बायकोला? तू ह्या मुलाला सांभाळत नाहीस, अरे मेल्या, मग माठासाठी का नाही बोललास? तेव्हा म्हणतो, तो तर डिवॅल्य होता. त्याची किंमतच नव्हती. किंमत नसेल तर आपण क्लेश करत नाही आणि किंमत असेल त्यासाठी क्लेश करत असतो ना! दोन्हीही वस्तु तर उदयकर्माच्या आधीन फुटत असतात ना! पण पहा, आपण माठासाठी क्लेश करत नाही! एका माणसाचे दोन हजार रूपये हरवले, तर त्याला मानसिक चिंताउपाधी होते. दुसऱ्या एका माणसाचे हरवले तर तो म्हणेल, 'हा कर्माचा उदय असेल तर झाले आता.' म्हणजे अशी समज असेल तर निकाल लावेल, नाही तर क्लेश निर्माण होतो. पूर्वजन्माच्या कर्मात क्लेश नसतात. क्लेश तर आताच्या अज्ञानतेचे फळ आहे. कित्येक माणसांचे दोन हजार जातात, तरी त्यांना काही फरक पडत नाही. असे घडते की नाही? कोणतेही दुःख उदयकर्माच्या आधीन नसते. सर्व दु:ख आपल्या अज्ञानतेचे आहे. कित्येक माणसांनी वीमा उतरवलेला नसतो, आणि त्यांचे गोदाम जळून जाते, त्यावेळी ते शांत राहू शकतात, आतून पण शांत राहू शकतात, बाहेर आणि आत दोन्ही प्रकारे आणि कित्येक माणसं तर, आत दुःख आणि बाहेर पण दुःख दाखवतात. ही सर्व अज्ञानता, असमंजसपणा आहे. ते गोदाम तर जळणारच होते. त्यात काही नवीन नाहीच. मग तु डोके फोडून जरी मेलास, तरीही त्यात बदल होणार नाही. प्रश्नकर्ता : अर्थात् कोणत्याही वस्तुच्या परिणामाला चांगल्या प्रकारे स्वीकारले पाहिजे? दादाश्री : होय, पॉझिटिव घ्यावे, पण ते ज्ञान असेल तर पॉझिटिव घेईल. अन्यथा बुद्धी तर निगेटिवच पाहते. संपूर्ण जग दु:खी आहे. मासे तडफडतात तसे तडफडत आहे. याला जीवन कसे म्हटले जाईल? समजून
SR No.030119
Book TitleKarmache Vignan
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2011
Total Pages94
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy