SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 34
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ जे घडले तोच न्याय चांगले. २५ प्रश्नकर्ता : पण दादा, जे आले ते स्वीकारुन घ्यायचे का जीवनात ? दादाश्री : मार खाऊन स्वीकारण्यापेक्षा आनंदाने स्वीकारुन घ्यावे ते प्रश्नकर्ता : संसार आहे, मुले आहेत, मुलांच्या बायका आहेत, हे आहेत, ते आहेत. म्हणून संबंध तर ठेवावे लागतात. दादाश्री : हो, सगळे ठेवायला पाहिजे. प्रश्नकर्ता : तर त्यात मार पडला तर काय करावे? दादाश्री : संबंध सगळे ठेवून जर मार पडला तर तो आपण स्वीकारुन घ्यावा. नाहीतरी मार पडला तर काय करता येईल ? दुसरा काही उपाय आहे? प्रश्नकर्ता : काही नाही. वकीला कडे जायचे. दादाश्री : होय, दुसरे काय होऊ शकणार? वकील रक्षा करेल का तो त्याची फी घेईल ? 'घडले तोच न्याय', तेथे बुद्धि 'आऊट' न्याय शोधायला लागला म्हणून बुद्धि ऊभी रहाते. बुद्धि जाणते कि, आता माझ्यावाचून चालणार नाही आणि आपण म्हणालो कि घडले तोच न्याय आहे. तेव्हा बुद्धि म्हणते, 'आता या घरी आपला प्रभाव नाही', ती मग निरोप घेते आणि निघून जाते. कोणी तिचा समर्थक असेल तिथे घुसते. तिच्या बदल आसक्ति ठेवनारे तर खूप लोक असतात ना ! नवस करतात, माझी बुद्धि वाढो, अशी ! आणि तेवढ्याच प्रमाणात समोरच्या पल्डयात जळजळ वाढत जाते. बॅलेन्स (समतोल) तर व्हायला पाहिजे ना नेहमी ? त्यांच्या समोर बॅलेन्स असायलाच पाहिजे. आमची बुद्धि संपली म्हणजे जळजळ ही संपली.
SR No.030117
Book TitleJe Ghadle Toch Nyay
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2013
Total Pages38
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy