SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 38
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार आपले बोलणे फळत नसेल तर आपण गप्प राहिले. आपण मूर्ख आहोत, आपल्याला बोलायला जमत नाही, तर मग गप्प बसले पाहिजे. एक तर आपले बोलणे फळत नसेल आणि उलट आपले मन बिघडेल आत्मा बिघडेल. असे कोण करणार? __ प्रश्नकर्ता : आई-वडील आपल्या मुलांसाठी जी ओढ दाखवतात, त्यावेळी बऱ्याचदा असे वाटते की हे अति होत आहे. दादाश्री : ते सर्व इमोशनल (भावूक) आहे. कमी दाखवणारा सुद्धा इमोशनल आहे. नोर्मल (सामान्य) असायला पाहिजे. नोर्मल म्हणजे फक्त बनावटी, 'ड्रामेटिक'. जसे नाटकातील स्त्रीसोबत नाटक करतात, तेव्हा ते वास्तविक, एक्जेक्ट असते. लोकांना खरेच वाटत असते. परंतु बाहेर आल्यानंतर तो कलाकर तिला सांगेल की 'चल माझ्या सोबत?' तर ती सोबत जाणार नाही, म्हणेल की ते तर नाटकापूरतेच होते. हे समजले ना? ह्या जगाला सुधारण्याचा मार्गच प्रेम आहे. जगातील लोक ज्याला प्रेम म्हणतात ते प्रेम नाही, ती तर आसक्ति आहे. ह्या बेबीवर प्रेम करतात, परंतु ती ग्लास फोडेल तेव्हा प्रेम राहते का? तेव्हा तर चिडतात तिच्यावर, म्हणून ती आसक्ति आहे. मुले प्रेम शोधत असतात, परंतु प्रेम त्यांना मिळत नाही, म्हणून त्यांच्या समस्या तेच जाणतात, सांगू ही शकत नाही, आणि सहनही होत नाही. आजच्या तरुणासांठी माझ्याकडे मार्ग आहे. ह्या जहाजाची धुरा कशा प्रकारे सांभाळायची, त्याचे मार्गदर्शन मला आतून मिळते. माझ्या आत असे प्रेम उत्पन्न झाले आहे की जे कधी वाढत नाही आणि घटत ही नाही. वाढणे-घटणे त्याला आसक्ति म्हणतात. जे वाढत नाही आणि घटत ही नाही ते परमात्म प्रेम आहे. म्हणून तर कोणताही माणूस वश होतो. मला कोणाला वश करायचे नाही, तरी सुद्धा प्रेमाने सगळे वश होत असतात. ज्याला खरे प्रेम म्हणतात ना, ते तर पहायला सुद्धा मिळत नाही. जगाने प्रेम पाहिलेच नाही. कधीकाळी ज्ञानी पुरुष अथवा भगवंत असतील तेव्हा प्रेम पाहू शकतात. प्रेम कमी-जास्त नाही होत, अनासक्ति असते. हेच प्रेम. ज्ञानींचे प्रेम हेच परमात्मा आहे.
SR No.030001
Book TitleAai Vadil Aani Mulancha Vyavhar
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2014
Total Pages101
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy