SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 12
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रस्तावना आई-वडील मुलांचा आहे व्यवहार; अनंतकाळापासून, तरीही आले नाही पार! मी वाढवले, मी शिकवले सांगू शकत नाही तुम्हास कोणी शिकवले? तेव्हा काय म्हणाल? अनिवार्य आहेत कर्तव्य सर्व मुलांप्रति; तुझे ही करणारे होतेच ना तुझे वडील! उगीच दटावून देऊ नको संताप; मोठी होऊन मुले देतील तुला मनस्ताप! अशी मुलं हवीत ही इच्छा तुम्ही करत; स्वतः दोघे कसे भांडतात ते तर नाही बघत ! आई मुळा आणि बाप असेल गाजर ! मुलं सफरचंद कशी होतील खरोखर? एका मुलाच्या संगोपनाची जबाबदारी; भारताच्या पंतप्रधानाहून नक्कीच भारी! तुझ्याहून अधिक पाहिली मी दिवाळी; तुम्ही पाहिली पणतीत आम्ही तर वीजेत, मुले म्हणाली! आई-वडीलांची भांडणे बिघडवते बालमानस; गुंतागुंतीत मूले फसतात मानतात त्यांना बोगस! धमकावून नाही समजत आजची मुले कधी; प्रेमानेच होणार उज्जवल एकवीसावी सदी! मारले, रागावले तरीही घटत नाही प्रेम जिथे; प्रेमाच्याच प्रभावाने मुले होतात महावीर तिथे! नवीन पिढी आहे हेल्दी माईन्डवाली; भोगवादी असेल तरी नाहीत कषायवाली! 11
SR No.030001
Book TitleAai Vadil Aani Mulancha Vyavhar
Original Sutra AuthorN/A
AuthorDada Bhagwan
PublisherDada Bhagwan Aradhana Trust
Publication Year2014
Total Pages101
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size1 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy