________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार 101 तर आई-वडीलांचे दोष (चूका) मुलांना दिसून येतात. त्यामुळे 'आईवडील नमस्कार करण्यायोग्य नाहीत' असे ते मानतात, म्हणून तर ते नमस्कार करत नाहीत. जर आई-वडीलांचे विचार व आचरण ऊंच, बेस्ट वाटले तर ते नमस्कार करतीलच. परंतु आज-कालचे आई-वडील तर मुले समोर उभी असताना सुद्धा भांडतात. आई-वडील भांडतात की नाही भांडत? अशा परिस्थितीत मुलांच्या मनामध्ये आई-वडीलांसाठी असलेला आदर कसा राहिल? ह्या जगात तीन व्यक्तींचे फार मोठे उपकार असतात. ते उपकार विसरण्यासारखे नाहीत. त्या व्यक्ती आहेत आई-वडील आणि गुरू. ज्यांनी आपल्याला चांगल्या आणि योग्य मार्गाला लावले, ह्या तिघांचेही उपकार कधीही विसरूच शकत नाही. जय सच्चिदानंद