________________ आई-वडील आणि मुलांचा व्यवहार प्रश्नकर्ता : असे नाही बोलायला पाहिजे, परंतु बोलून टाकतो त्याचे काय? मिस्टेक होऊन जाते तर काय? दादाश्री : हो, मग घसरून का पडत नाही? कारण की, तेथे सावध रहातात आणि त्यातून घसलास तर वडील पण समजून जातात की बिचारा घसरून पडला. हे जर तू जाणून-बुजून असे करायला गेला तर 'तू येथे कसा घसलास?' त्याचे उत्तर मी मागितले. तर ते बरोबर आहे की चुकीचे? शक्यतो आपल्याकडून तसे व्हायला नको, त्यातून जर तुझ्याने तसे काही होऊन गेले तर सगळे समजून जातील की नाही, हा असे करणारा नाही आहे. आई-वडीलांना खुश ठेवायचे. ते तुला खुश ठेवायचा प्रयत्न करतात की नाही ? त्यांना सुखी करावे असे तुला वाटत नाही का? प्रश्नकर्ता : होय, वाटते ना! परंतु दादाजी, मला असे वाटते की त्यांना कटकट करण्याची सवयच झाली आहे. दादाश्री : होय, पण त्यात तुझीच चुक आहे, म्हणून तर आईवडीलांना दुःख झाले, त्याचे प्रतिक्रमण करायला हवे. त्यांना दुःख तर व्हायला नको, 'मी सुख द्यायला आली आहे' असे तुझ्या मनात व्हायला हवे. 'माझी अशी काय चुक झाली की आई-वडीलांना दुःख झाले' असे आतून वाटले पाहिजे. वडील वाईट आहे असेतर वाटत नाही ना? आणि जर असे वाटले तर काय करशील ? खरे तर वाईट असे या जगात काहीच नाही. आपल्याला जे मिळाले त्या सर्व चांगल्याच वस्तु असतात. कारण आपल्या प्रारब्धाने मिळतात. आई मिळाली, ती पण चांगली. कितीही काळीकूट्ट असो, तरी पण आपली आई चांगलीच आहे. जी आपल्याला प्रारब्धाने मिळाली ती चांगली. तिला बदलून दुसरी आणू शकतो का? प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : बाजारात दुसरी आई विकत मिळत नाही? आणि मिळाली तरी ती काय कामाची? गोरी आई आवडली तरी पण