SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 403
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. avviene renes पान ३५३. भुक्तिवस्त्रं परित्यज्य धारयेदन्यदम्बरम् ॥ पूगताम्बूलपर्णानि गृहीयान्मुखशुद्धये ॥ २२७ ॥ अर्थ — जें वस्त्र नेसून आपण भोजन केलेले असेल तें वस्त्र टाकून दुसरें वस्त्र नेसावें. नंतर मुखाच्या शुद्धीकरितां तांबूल भक्षण करावें. ताम्बूलचर्वणं कुर्यात्सदा भुक्त्यन्त आदरात् ॥ अभ्यत्रे चैव मांगल्ये रात्रावपि न दुष्यति ॥ २२८ ॥ अर्थ - भोजनानंतर तांबूल भक्षण प्रेमानें करावें. अंगाला तेल लावून स्नान केलें असतां आणि मंगलकृत्यांत रात्रीं तांबूल भक्षण केलें तरी दोष नाहीं. Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir तांबूलविधि. प्रातःकाले फलाधिक्यं चूर्णाधिक्यं तु मध्यमे ॥ पर्णाधिक्यं भवेद्रात्रौ लक्ष्मीवान् स नरो भवेत् ।। २२९ ।। अर्थ - प्रातःकालीं तांबूल भक्षण करणें झाल्यास त्यांत सुपारी अधिक घालावी. दोनप्रहरीं चुना अधिक असावा. आणि रात्री पानें अधिक असावीत. ह्याप्रमाणें जो तांबूल भक्षण करतो तो संपत्तिमान् होतो. पर्णमूले भवेव्याधिः पर्णाग्रे पापसम्भवः ॥ For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy