________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारत सुभाषितानि
४४२ न जातु विवृतः कार्यः शत्रुः सुनयमिच्छता ।। १२ । १०५/१४
उत्कृष्ट प्रकारच्या नीतीप्रमाणें वागूं इच्छिणाऱ्या पुरुषानें केव्हांहि उघड रीतीनें शत्रुत्व करूं नये.
४४३ न जानपदिकं दुःखमेकः शोचितुमर्हति ।
अशोचन्प्रतिकुर्वीत यदि पश्येदुपक्रमम् ।। १२ । ३३०।१५ सर्व देशाच्या दुःखाचा एकट्यानें शोक करणें युक्त नव्हे. शोक न करितां प्रतिकाराचा जर कांहीं उपाय सुचला तर तो मात्र अंमलांत आणावा.
४४४ न तत्तरेद्यस्य न पारमुत्तरेत् न तद्धरेद्यत्पुनराहरेत्परः । न तत्खनेद्यस्य न मूलमुद्धरेत्
न तं हन्याद्यस्य शिरो न पातयेत् ।। १२/१४०/६९ ज्याच्या पैलतीराला पोंचतां येणार नाहीं तें तरून जाण्याच्या भरीस पडूं नये. जें फिरून कोणी आपल्यापासून हिरावून घेईल त्याचें हरण करूं नये. ज्याचें मूळ उपटून टाकतां येत नाहीं तें खणूं नये. ज्याचें शीर खालीं पाडतां येत नाहीं त्याच्यावर प्रहार करूं नये.
४४५ न तत्परस्य संदध्यात्प्रतिकूलं यदात्मनः ।
७१
एष संक्षेपतो धर्मः कामादन्यः प्रवर्तते || १३ | ११३८
आपल्याला अनिष्ट अशी जी गोष्ट ती दुसऱ्याच्या संबंधाने करूं नये. धर्माचें संक्षिप्त स्वरूप हैं असें आहे. याला सोडून असलेला तो निव्वळ स्वेच्छाचार होय. ४४६ न तथा बाध्यते कृष्ण प्रकृत्या निर्धनो जनः ।
यथा भद्रां श्रियं प्राप्य तया हीनः सुखैधितः ॥ ५/७२/२९
( युधिष्ठिर श्रीकृष्णांना म्हणतो ) उत्तम प्रकारचें वैभव प्राप्त होऊन सुखांत वाढलेल्या मनुष्याला तें वैभव नष्ट झालें असतां जेवढे दुःख होतें, तेवढे मूळांतच दरिद्री असलेल्या मनुष्याला होत नाहीं.
For Private And Personal Use Only