SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 72
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ६२ सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ३८७ द्यक्षरस्तु भवेन्मृत्युस्यक्षरं ब्रह्म शाश्वतम् । ममेति च भवेन्मृत्युन ममेति च शाश्वतम् ॥१२।१३।४ दोन अक्षरे म्हणजे मृत्यु व तीन अक्षरे म्हणजे शाश्वत ब्रह्म होय. 'मम' म्हणजे माझे असें मानिल्याने मृत्यु, आणि 'न मम' म्हणजे माझें नव्हे असे मानिल्याने शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होते. ३८८ धनं लभेत दानेन मौनेनाज्ञां विशांपते । उपभोगांश्च तपसा ब्रह्मचर्येण जीवितम् ॥ १३७।१४ दान करून धन मिळवावें, मौनाने, लोकांनी आपल्या आज्ञेप्रमाणे वागणे, तपश्चर्येने उपभोग आणि ब्रह्मचर्याने ( दीर्घ ) जीवित ही प्राप्त करून घ्यावी, ३८९ धननाशेऽधिकं दुःखं मन्ये सर्वमहत्तरम् । ज्ञातयोह्यवमन्यन्ते मित्राणि च धनाच्युतम्॥१२॥१७७३४ (वैराग्य संपन्न मंकि म्हणतो) मला वाटते, द्रव्यनाशाचे दुःख सर्वात अत्यंत अधिक, कारण नातलग व मित्रहि द्रव्य नष्ट झालेल्याचा अपमान करितात. ३९० धनमाहुः परं धर्म धने सर्व प्रतिष्ठितम् । जीवन्ति धनिनो लोके मृता ये त्वधना नराः॥५/७२।२३ धन मिळविणे हा श्रेष्ठ धर्म होय असे म्हणतात. धनावरच सर्व काही अवलंबून आहे. धनसंपन्न लोकच जगांत जिवंत असतात. धनहीन पुरुष मेल्यांतच जमा. ३९१ धनात्कुलं प्रभवति धनाद्धर्मः प्रवर्धते । नाधनस्यास्त्ययं लोको न परः पुरुषोत्तम ॥ १२।८।२२ (अर्जुन युधिष्ठराला म्हणतो ) हे नरश्रेष्ठा, धनाच्या योगानें कुळाचा उत्कर्ष होतो. धन असेल तर धर्माची वाढ होते. निर्धनाला ना इहलोक ना परलोक, For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy