________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीभागवतसुभाषितानि
४० तद्वै धनुस्त इषवः स रथो हयास्ते
सोऽहं रथी नृपतयो यत आनमन्ति । सर्व क्षणेन तदभूदसदीशरिक्तं
भस्मन्हुतं कुहकराद्धमिवोप्तमूष्याम् ॥ १।१५।११ . (श्रीकृष्ण निजधामास गेल्यानंतर अर्जुनाचा गवळ्यांनी पराजय केला त्यासंबंधाने अर्जुन युधिष्ठिरास सांगतो. ) संग्रामाचेवेळी राजे लोक ज्याला नमस्कार करीत असत, तेच गांडीव धनुष्य, तेच बाण, तोच अग्नीने दिलेला दिव्यरथ, तेच घोडे, तोच मी रथी पण हे सर्व साहित्य श्रीकृष्णाचा वियोग झाल्यामुळे एका क्षणांत व्यर्थ झालें! भस्मामध्ये केलेलें हवन, मायावी पुरुषांपासून मिळविलेल्या वस्तु किंवा उखर म्हणजे खाऱ्या जमिनीत पेरलेले धान्य ही ज्याप्रमाणे व्यर्थ होतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे अधिष्ठान नाहीसे झाल्याबरोबर माझे सर्व सामर्थ्य फुकट गेले. ४१ तप्यन्ते लोकतापेन साधवः प्रायशो जनाः।
परमाराधनं तद्धि पुरुषस्याखिलात्मनः ॥ ८७४४ साधु पुरुष बहुतकरून लोकांच्या दुःखाने स्वतः दुःखी होतात. ( लोकांचे दुःख निवारण करण्यासाठी स्वतः दुःख भोगितात.) दुसन्याकरितां दुःख सहन करणे हेच सर्वात्म्या परमेश्वराचे उत्कृष्ट आराधन होय. ४२ तांस्तान्कामान्हरिदद्यात् यान् यान् कामयते जनः ।
आराधितो यथैवैष तथा पुंसां फलोदयः॥४१३॥३४ मनुष्य ज्या ज्या विषयांची इच्छा धारण करतो , ते ते विषय श्रीहरि त्याला देतो. जसें हरीचें आराधन करावें, तशीच फलप्राप्ति मनुष्यांना होते.
For Private And Personal Use Only