________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ३५ १६८ जीवं विवेकिनमिहोपदिशन्ति तज्ज्ञा
नो बालमुद्धममसन्मयमार्यमुक्तम् ॥ ६।४११५९ तत्त्वज्ञ लोक विवेकी जीवालाच उपदेश करतात. श्रेष्ठ लोकांनी ज्याची उपेक्षा केली आहे, देहादिकांच्या ठिकाणी जो आसक्त आहे अशा अत्यंत भ्रमिष्ट मूर्खाला ते उपदेश करीत नाहीत. १६९ जीवितं गलति क्षिप्रं जलमञ्जलिना यथा ।
प्रवाह इव वाहिन्या गतं न विनिवर्तते ॥ ७९३।८९ ओंजळीत घेतलेले पाणी ज्याप्रमाणे गळून जाते, त्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी होत जाते. नदीचा पुढे गेलेला ओघ जसा माग येत नाही, तसे गेलेले आयुष्य परत येत नाही. १७० जेतुमन्यं कृतोत्साहैः पुरुषैरिह पण्डितैः ।
पूर्व हृदयशत्रुत्वाजेतव्यानीन्द्रियाण्यलम् ॥ ४।२३।५९ दुसन्यांना जिंकण्याची हाव धरणाऱ्या सुज्ञ पुरुषांनी प्रथम आपल्या हृदयाच्या शत्रुभूत असलेल्या इंद्रियांना जिंकावे. १७१ ज्ञातज्ञेयस्य मनसो नूनमेतद्धि लक्षणम् ।
न स्वदन्ते समग्राणि भोगवृन्दानि यत्पुनः ॥ २२॥३ ज्ञेयतत्त्व जाणल्याची म्हणजे परब्रह्मसाक्षात्कार झाल्याची हीच खूण आहे की, त्या स्थितीनंतर सर्व त-हेच्या विषयोपंभोगांबद्दल कायमचा वीट येऊन जातो. १७२ ज्ञानं हि परमं श्रेयः ॥ ६।८७१६ ज्ञान हेच परमश्रेष्ठ आहे.
For Private And Personal Use Only