SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 275
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थ श्रीरामायणसुभाषितानि ३६९ यथा पुष्करपत्रेषु पतितास्तोय बिन्दवः । न श्लेषमभिगच्छन्ति तथाऽनार्येषु सौहृदम् || ६ | १६।११ कमलपत्रांवर पडलेले जलबिंदु ज्याप्रमाणें त्या पत्रांना चिकटत नाहींत, त्याचप्रमाणें दुष्ट पुरुषांचे अंतःकरणांत मैत्री ठरत नाहीं. ३७० यथा पूर्व गजः स्नात्वा गृह्य हस्तेन वै रजः । दूषयत्यात्मनो देहं तथाऽनार्येषु सौहृदम् || ६ | १६ | १५ ७७ ज्याप्रमाणें हत्ती प्रथमतः स्नान करितो, आणि नंतर लगेच सोंडेनें धूळ घेऊन आपले सर्व शरीर मलिन करितो, ( म्हणजे स्नानामुळें प्राप्त झालेली निर्मलता नाहींशी करून टाकितो) त्याप्रमाणें दुष्ट लोक पूर्वी संपादन केलेला स्नेह स्वतःच नाहींसा करून टाकितात. ३७१ यथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनाद्भयम् । एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणाद्भयम् ॥ २।१०५।१७ ज्याप्रमाणे पक्व फलांना पतनावांचून दुसरें भय नाहीं, त्याचप्रमाणें जन्मास आलेल्या मनुष्यांना मरणावांचून दुसरें भय नाहीं. ३७२ यथा हि कुरुते राजा प्रजास्तमनुवर्तते ॥ ७|४३|१९ जसें राजा करूं लागतो, तसें लोकही त्याला अनुसरून वागूं लागतात. ३७३ यथा ह्यनुदका नद्यो यथा वाप्यतृणं वनम् । अगोपाला यथा गावस्तथा राष्ट्रमराजकम् ॥ २२६७/२९ जशा उदकहीन नद्या, जसें तृणरहित वन, जशा गुराख्यावांचून गाई, त्याप्रमाणें अराजक राष्ट्र होय. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy