SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 22
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm ६५ अपि शाकं पचानस्य सुखं वै मघवन्गृहे। अर्जितं स्वेन वीर्येण नाप्यपाश्रित्य कंचन ॥३॥१९३२९ (बकमुनि म्हणतात ) हे इंद्रा, कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या हिंमतीने मिळविलेली मीठभाकर सुद्धा स्वतःच्या घरी खाण्यांत सुख आहे. ६६ अपि सर्वस्वमुत्सृज्य रक्षेदात्मानमात्मना।।१२।१३८।१७९ सर्वस्वाचा त्याग करून देखील आपण आपलें रक्षण करावें. ६७ अप्युन्मत्तात्पलपतो बालाच्च परिजल्पतः । सर्वतः सारमादद्यादश्मभ्य इव काञ्चनम् ॥ ५॥३४॥३२ वेडाच्या लहरींत बरळणाऱ्या वेड्यापासून, तसेच बोबडे बोल बोलणाऱ्या बालकापासून, सर्वांपासून, दगडांतून सोने निवडावे त्याप्रमाणे, चांगले तेवढे ग्रहण करावे. ६८ अप्रयत्नागताः सेव्या गृहस्थैर्विषयाः सदा । प्रयत्नेनोपगम्यश्च स्वधर्म इति मे मतिः ॥ १२।२९५३३५ (पराशर मुनि जनकराजाला म्हणतात ) मुद्दाम प्रयत्न न करितां प्रारब्धानुसार ओघानें प्राप्त होतील तेवढ्याच विषयांचे गृहस्थाश्रमी पुरुषाने सेवन करावे, आणि स्वधर्माचे आचरण प्रयत्नपूर्वक करावे असे माझे मत आहे. ६९ अप्राप्तकालं वचनं बृहस्पतिरपि ब्रुवन् । लभते बुद्धयवज्ञानमवमानं च भारत ।। ५।३९।२ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो ) समयाला न शोभण्यासारखे भाषण करणारा बृहस्पति जरी असला तरी त्याच्या बुद्धीचा तिरस्कार होतो व तोहि अपमानालाच पात्र होतो. ७० अबलस्य कुतः कोशो ह्यकोशस्य कुतो बलम् । ___ अबलस्य कुतो राज्यमराज्ञः श्रीभवेत्कुतः ॥ १२॥१३३१४ दुर्बळाला द्रव्य कोठून मिळणार ? व ज्याच्यापाशी द्रव्य नाही त्याला सामर्थ्य कोठलें ? तसेच ज्याला सामर्थ्य नाही त्याचे राज्य कसे राहणार ? व राज्य नाहींसें झाले म्हणजे संपत्ति तरी कशी टिकणार ? For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy