SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 20
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि ५४ अन्यथा चिन्तितो ह्यर्थः पुनर्भवति सोऽन्यथा । _अनित्यमतयो लोके नराः पुरुषसत्तम ॥ ५८०६ ( नकुल श्रीकृष्णाला म्हणतो) हे पुरुषोत्तमा, मनुष्याने एका प्रकाराने केलेला बेत पुनः फिरलेला दिसतो. याचे कारण ] जगांत माणसांची बुद्धि नेहमीं पालटत असते. ५५ अन्यया यौवने मत्यों बुद्धया भवति मोहितः । मध्येऽन्यया जरायां तु सोऽन्यां रोचयते मतिम्॥१०॥३।११ मनुष्याला तरुणपणी एका विचाराची भुरळ पडते; प्रौढ वयांत दुसरीच एकादी गोष्ट बरी वाटते; व म्हातारपणी तिसराच एखादा विचार आवडू लागतो. ५६ अन्यान्परिवदन्साधुर्यथा हि परितप्यते । तथा परिवदन्नन्यांस्तुष्टो भवति दुजेनः ॥११७४।९२ दुसऱ्याची निंदा करण्यांत सज्जनाला जितका खेद वाटतो, तितकाच दुर्जनाला परनिंदा करण्यांत संतोष वाटतो. ५७ अन्यो धनं प्रेतगतस्य भुङ्के वयांसि चाग्निश्च शरीरधातून् । द्वाभ्यामयं सह गच्छत्यमुत्र पुण्येन पापेन च वेष्टयमानः ।। ५।४०१६ कुडी सोडून गेलेल्या जीवाचे धन दुसरा कोणी भोगतो, [ रक्त-मांसादि] देहस्थ धातु पक्षी व अग्नि यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. फक्त दोन गोष्टी बरोबर घेऊन जीव परलोकी जातो. त्या म्हणजे त्याने इहलोकी केलेले पुण्य व पाप. ५८ अन्योधर्मः समर्थानामापत्स्वन्यश्च भारत॥१२॥१३०१४ (भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे भारता, सामर्थ्य असतां आचरण्याचा धर्म निराळा आणि संकटप्रसंगाचा धर्म निराळा. ५९ अन्योन्यसमुपष्टम्भादन्योन्यापाश्रयेण च ।। ___ ज्ञातयः संप्रवर्धन्ते सरसीवोत्पलान्युत ॥ ५॥३६३६ तळ्यांत वाढणाऱ्या कमलांप्रमाणे, परस्परांस साहाय्य करून व परस्परांचा आश्रय घेऊन ज्ञातींचा उत्कर्ष होत असतो. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy