SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 73
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir अध्यात्मकल्पद्रुमाचें ...इति प्रवचनसारोद्धारे । प्र. र. भाग ३ पृ. ३९४. लेश्या शब्दाचा अर्थ अध्यवसायविशेष असा आहे. कृष्ण, नील, कापोत, तेजः, पद्म, व शुक्ल ह्या सहा लेश्यांचे स्वरूप खाली दिलेल्या दृष्टांतावरून स्पष्ट कळेल. सहाजण सोबतीने वाट चालत असतां एका जांभळीच्या जवळ येऊन पोहोचले. तेव्हां त्यांपैकी एकाच्या मनांत विचार आला की पिकलेली जांभळे हाती येण्याकरितां झाडच मूळापासून तोडावे. विचाराप्रमाणे कृती करण्यास प्रवृत्त झाला तो त्यास दुसरा ह्मणाला मोठी शाखा तोडावी हे माझ्या विचारास येते. हे ऐकून तिसरा सुचवितो की फलयुक्त लघुशाखा छेदावी. चवथ्याला ही गोष्ट पसंत न पडल्यामुळे, घोंस खाली पडतील अशी युक्ति लढवावी असें त्याने आपल्या सोबत्यांस सांगितले. त्यावर पांचवा उत्तर करतो की पिकलेली जांभळे वर चढून तोडून खावी. शेवटीं सहावा झणाला गळून खाली पडलेली पक्क जांभळे वेंचून खावी हे सर्वात उत्तम. वणित्रयी दृष्टान्तः-एका शेट्याला तीन पुत्र होते. त्यांना प्रत्येकी एक एक हजार रुपये देऊन परदेशी व्यापार करावयास पाठविले. तेथे एका पुत्राने आपले धन नाचतमाशे करण्यांत व खाण्यापिण्यांत घालविले. दुसऱ्याने व्यापारधंदा करण्याकडे खर्च करून त्यापासून होणारे उत्पन्नावर आपला निर्वाह चालविला व मूलधन कायम ठेवले. तिसऱ्यानेही व्यापार केला परंतु उत्पन्नापैकी अवश्य तेवढाच भाग खर्च करून बाकीचे उत्पन्न मूलधनांत जमा करीत असे. ईशकृपेनें प्राप्त झालेला महादुर्लभ अशा नरदेहाचा लाभ वणिकपुत्राच्या मूलधनाप्रमाणे आहे. त्याचा सदुपयोग किंवा दुरुपयोग किंवा नाश ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. श्लोक १३२ पहा. वसुराजकथाः-पर्वत, वसु व नारद यांना एके वेळी त्यांच्या गुरूने सांगितले की तुह्मांपैकी प्रत्येकाने हा एकेक पिष्टकुक्कुट कोणासही दिसणार नाही अशा ठिकाणी मारून टाकावा. पहिल्या दोघांनी एकांती जाऊन पिष्टकुक्कुटाचा वध केला. नारदाने मात्र केला नाही कारण त्याने आपल्या मनात विचार केला की .. "नास्त्येव स्थानमपि तद्यत्र कोऽपि न पश्यति". वैयावृत्त्यः-आयरिय उवज्झाय तवस्सि सेहे गिलाण साहुसु । समणोन्न संघ कुल गण वेयावचं हवह दसहा ॥ आचार्य, उपाध्याय, तपस्वी, शिष्य, ग्लान, साधु, समनोज्ञ (ज्याची स्वतःसारखी समाचारी आहे), संघ, समानगच्छांचा समूह, समान आचार्यांची शिष्य For Private And Personal Use Only
SR No.020017
Book TitleAdhyatma Kalpadrum
Original Sutra AuthorN/A
AuthorDhanvijaygani, Shivram Tanba Dobe
PublisherNirnaysagar Press
Publication Year1906
Total Pages86
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size3 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy