SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 67
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ५८ अध्यात्मकल्पद्रुमाचे परीषहः-खुहा पिवासा सीउण्हं दसाचेलारइथिओ । चरिया निसीहिआ सेजा अकोस वह जायणा ॥ अलाभ रोग तणफास मलसक्कारपरीसहा । पन्ना अन्नाण सम्मत्तं ईइ बावीस परीसहा ।। प्रवचनसारोद्धारे पृ. २६५ अर्थः-क्षुधा, पिपासा, शीत, उष्ण, दंश, अचेल, अरति, स्त्री, चर्या, निषद्या, शय्या, आक्रोश, वध, याचना, अलाभ, रोग, तृणस्पर्श, मल, संस्कार, प्रज्ञा, अज्ञान, सम्यक्त्व ( अथवा दर्शनपरीषह ). जैनतत्वादर्श पृ. २३६---- २३९ स्पष्टीकरणार्थ पहा. पल्योपम काल:-एक योजन रुंद व एक योजन खोल असा वाटोळा खळगा करून मनुष्याच्या केसापेक्षां पांचशे पट सूक्ष्म अशा केशांच्या अणुरेणुसारख्या बारीक तुकड्यांनी तो असा ठासून ठासून भरून काढावा की ज्यावरून चक्रवतींची सेनाही चालून गेली असतां ज्यांतील एक परमाणु देखील दबणार नाही. या ठासून भरलेल्या तुकड्यांपैकी एकेक तुकडा शंभर शंभर वर्षांनी काढून तो खळगा रिक्त होण्यास लागणारा जो वेळ त्यास पल्योपमकाल ही संज्ञा आहे. अशा पल्योपम कालाच्या कोटिकोटि व्यतीत झाल्या असतां त्यास सागरोपमकाल ह्मणतात. दहा कोटिकोटि सागरोपमकाल व्यतीत झाला असतां एक उत्सर्पिणीकाल व तितकाच काळ लोटून गेला असतां एक अवसर्पिणीकाल होतो. उत्सर्पिणी व अवसर्पिणी मिळून एक कालचक्र ह्मणजे वीस कोटिकोटि सागरोपमकाल. पंचवीस क्रिया:-कायिकी क्रिया, आधिकरणिकी क्रिया, प्राद्वेषिकी क्रिया, परितापनिकी क्रिया, प्राणातिपातिकी क्रिया, आरंभिकी क्रिया, पारिग्राहिकी क्रिया, मायाप्रत्ययिकी क्रिया, मिथ्यादर्शनप्रत्ययिकी क्रिया, इ० इ० [जैनतत्वादर्श पृ. २३२-२३३ पहा ] प्रतिमाः-जेव्हां संयमचारित्राचा अंश जागृत होऊन व भोगाच्या अरुचीचा परिणाम होऊन कोणत्या तरी प्रतिशेचा उदय होतो तेव्हां त्याला प्रतिमा ह्मणतात. प्रतिमांची नांवें खाली दिल्याप्रमाणे आहेत:-- __ १ दर्शनप्रतिमा-आठ मूलगुणांचा संग्रह करून व व्यसनक्रिया वर्जून सम्यग्दर्शनगुणास निर्मल करणे. (एक मासाची) For Private And Personal Use Only
SR No.020017
Book TitleAdhyatma Kalpadrum
Original Sutra AuthorN/A
AuthorDhanvijaygani, Shivram Tanba Dobe
PublisherNirnaysagar Press
Publication Year1906
Total Pages86
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size3 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy