SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 53
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir अध्यात्मकल्पद्रुमाचे माझ्या गांवाजवळच्या विहिरीच्या काठी गवत उगवले आहे. त्याचे अग्रावर जे उदकबिंदु आहेत ते प्राशन करण्याची माझी इच्छा आहे करितां मला तेथे नेऊन पोहोचवावे. त्याप्रमाणे त्या सिद्धाने त्याला त्या स्थळी नेऊन ठेवला परंतु ते तृणाग्रलग्न बिंदु तो मूर्ख शिरोमणि तेथे येऊन पोहोचण्याचे पूर्वीच गळून पडले होते. हाती आलेले निधान टाकून देऊन अनिश्चित व अत्यल्प लाभाकडे धांव मारणारा प्राणी मूर्खशिरोमणीशिवाय दुसऱ्या कोणत्या पदवीस पात्र आहे ? श्लो. १३२ पहा. उपधि--पत्तं पत्ताबंधो पायछवणं च पायकेसरिया । पडलाइ रयत्ताणं च गोच्छओ पायनिज्जोगो ॥ तिन्नेव य पच्छागा रयहरणं चेव होइ मुहपत्ती । एसो दुवालसविहो उवही, जिनकप्पियाणं तु ॥ एए चेव दुवालस मत्तग अइरेग चोलपट्टो उ । एसो चउदसरूवो उवही पुण थेरकप्पस्स ॥ [प्रवचनसारोद्धारे । प्रकरण रत्नाकर भाग ३ पृ. १३३ ] अर्थः-पात्र, पात्रबंध, पात्रस्थापनक, पात्रकेसरिका, पटल, रजस्त्राण, गोच्छक, प्रच्छादकत्रय, रजोहरण, व मुखवस्त्रिका हे द्वादश उपधि जिनकल्पी जैनसाधूपाशी असतात. हे बारा व एक मात्रकापेक्षा किंचित अधिक भिक्षाद्रव्य व चोलपट असे चवदा स्थविरकल्प साधूजवळ असतात. उरभ्रदृष्टान्त-एका गृहस्थाने एक बोकड पाळला होता. पाहुणचाराचे वेळी त्याचा उपयोग व्हावा या हेतूने त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम ठेविली होती. आपल्या धन्याचा मनोगत हेतु त्याला न कळल्यामुळे तो बोकड खाण्यापिण्याचे सुखांत मग्न झाला होता. याशिवाय दुसरा कोणताही विचार त्याचे डोक्यांत येत नव्हता. एके दिवशी त्या गृहस्थाचे घरी पाहुणा आला. त्याचे उपयोगासाठी जेव्हां त्या बोकडाचे गळ्यावर सुरी आली तेव्हां तो मोख्याने ओरडूं लागला. पण अंतकाली या ओरडण्याचा काय उपयोग? यावज्जीव विषयसेवन करून त्यांच्या दारुण विपाकाचा प्रसंग आल्यावर रडून उपयोग काय ? श्लो. १३२ पहा. करटोत्करट कथाः---करट व उत्करट नांवाचे दोन महातपस्वी होते. ते एका नगराच्या कोटासभोवती असलेल्या खंदकांत येऊन राहिले. वर्षाऋतूंत For Private And Personal Use Only
SR No.020017
Book TitleAdhyatma Kalpadrum
Original Sutra AuthorN/A
AuthorDhanvijaygani, Shivram Tanba Dobe
PublisherNirnaysagar Press
Publication Year1906
Total Pages86
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size3 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy