SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 50
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir अध्यात्मकल्पद्रुमाच परिशिष्ट. ( अकारादि अनुक्रमाने) अजागलकर्तरीय न्यायः--एक खाटिक एका बकरीला वधस्थानी घेऊन गेला आणि तिच्या मानेवर सुरी ठेवणार तो त्याला अचिंतित घरांत जाण्याचे कारण पडले. त्यामुळे सुरी तेथेच टाकून तो घरांत गेला. इकडे बकरीने ती सुरी लपवून ठेवण्यासाठी पायांनी जमीन खणली व त्या खळग्यांत तिने सुरी ढकलली ती त्यांत उभी पडली. तीवर पायांनी माती ढकलून बकरी बसावयास गेली तेव्हां तिची मान सुरीचे टोकावरच पडली आणि ती तत्काल मरण पावली. प्रसंगविशेषीं स्वतःची क्रिया स्वतःलाच घातक होते हे सुचविले आहे. श्लो. १८१ पहा. अजीवः--षड्द्रव्य शब्दावरील टीप पहा. अभिप्रहः-द्रव्य, क्षेत्र, काल व भाव यांच्या योगाने चार प्रकारांचा, अबतें:--जीवहिंसा, मृघावाद, अदत्तादान, मैथुन व परिग्रह हे अवताचे प्रकार, चार गतींची निबंधनकम ज्याच्या योगाने सर्व बाजूंनी एकत्र होतात त्यास परिग्रह ही संज्ञा आहे. अविरतिः-पांच इंद्रियांना स्वस्व विषयांत यथेच्छ प्रवविणे, पापमय वस्तूपासून मनाला न आवरणे, व सहा जीवनिकायांच्या हिंसेंत प्रवृत्त होणं, हे अविरतीचे बारा प्रकार, अष्टकर्माणि अथवा प्रकृतयः-( १ ) ज्ञानावरणीयकर्म [ श्रुतमतिज्ञानादि पंचविध ज्ञानाचे आवरण करणारे कर्म.] (२) अंतरायकर्म [ज्याचे योगाने जीवाला लाभादिकाची प्राप्ति होत नाही. ] -त्याचे प्रकारः----दानांतराय, लाभांतराय, भोगांतराय, उपभोगांतराय, व वीर्यातराय. (३) दर्शनावरणीयकर्म [ सामान्य अवबोधाला दर्शन ह्मणतात. त्याला For Private And Personal Use Only
SR No.020017
Book TitleAdhyatma Kalpadrum
Original Sutra AuthorN/A
AuthorDhanvijaygani, Shivram Tanba Dobe
PublisherNirnaysagar Press
Publication Year1906
Total Pages86
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size3 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy