SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 759
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ७३४ : आराधना कथाकोव मग तो वल्मीक खोदला । त्यात तो मंजूसा निघाला । पेटारा उकलून पाहिला । पाहिले रत्नाला अनुपम ||२२४|| रत्नमय श्री पार्श्वनाथ । पाहता पापनाशनार्थ । राया संतोष मनोरथ । भक्तिपंथ धर्मं वत्सल ।।२२५ ॥ तेथे चैत्यालये बांधोनिया । अगळदेव स्थापोनिया | कारागरे कोरीतिया । प्रतिमा त्याठाया आकार ।।२२६॥ राजा पाहे तेथे येवोनी । नाभि देखिली दीर्घनयनी । कारागरा टाक काढोनी । बोले वदनी शिल्पकार ||२२७॥ राया हे काढिता सत्वर । सोंडसारखी पानीधार । जैसा गंगेसी येतो पुर । जळ भरपूर चैत्यालये ॥ २२८ ॥ राजा म्हणे काढ वेगीन । टाकी लाऊन यत्न करून । जैसे कारंज उडे वेगेन । राया मने संशय फिटे ।। २२९ ।। बाहेर येवोनि पश्चात्ताप । राजा करी निंदा आपोआप । शिल्पिकावरी केला कोप । हृदय व्याप चिंतातुर ||२३०|| विचार करिता मनासी । निश्चय केला हृदयासी । रत्नप्रतिमा दिसे मजसी । अन्न उदकासी घेईन || २३१|| तेव्हा करकंडुरायान । दर्भशय्यावरी बैसोन । सर्वहि संन्यास घेवोन । तीन दिन त्या मौनमुद्रा ||२३२ || तत् पुण्य करोनी शीघ्रता । नागकुमार आला त्वरिता । राया ऐकावी पूर्ववार्ता | काळकर्ता रत्नबिंब हे ॥ २३३ ॥ चतुर्थ काळाचि ठेवि हे । पंचमकाळि जतन नव्हे । म्याच आच्छादन केली हे । जळप्रवाहे भरपूर ||२३४|| नागकुमार मी देवाचा । निश्चय पाहून तुमचा । देव धाडिल सत्यवाचा । भावार्थ तुमचा सत्यची ॥ २३५ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy