SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 757
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ७३२ : आराधना-कथाकोंब आसन्न भव्य प्राणी जानोनी । मधुर गिरा करोनी वाणी । राया ऐक चित्र देवोनी । पुण्यकरणी अगाध पै ॥ २००॥ कुंतल देश तेरपुरी । पूर्वजन्म याच नगरी । पुण्य नाही जीवा पदरी । विपत्ति भारी दरिद्रता || २०१ || या नगरीचे राज्यधर । नील महानील चतुर । जिनभक्त श्रेष्टी वसुमित्र । पवित्र तत् गृही धनदत्त ॥ २०२ ॥ | गडरक्षक गडपाळ | म्हणोनी नाम त्या गोपाळ | एके दिनी तडागतळ । सहस्रदळ कमळ मध्ये || २०३ || ते घ्यावया पोहत । शेषकन्या त्यासी रक्षित । पुष्प हे सर्वोत्कृष्ट देवात । आनिक कोन्हात योग्य नसे || २०४ || गोपाळ म्हणे त्याच देवासी । फूल नेतो - श्रेष्ठी गृहासी । वृत्तान्त सांगे श्रेष्ठी राज्यासी । पुसावयासी आले येथे ॥२०५॥ हेच सहस्रकूट चैताळ | सुगुप्ताचार्य मुनी दयाळ | सांगती ऐकती गोपाळ । हेचि कृपाळ सर्वोत्कृष्ट ।।२०६।। एक पुष्प वाहल तुवा । तेन प्राप्त ऐशा वैभवा । मा अष्टविधा पूजा देवा । करिता ठेवा मोक्षपद || २०७|| मुनीवचन ऐकोनिया । जातिस्मरण जाल राया । शरीर कंप होवोनिया । क्षिति शय्या घाम अंगी ||२०८ || सीतोपचार करोनी त्या । उठोनी बैसला वोळखी त्या । मम भवांतराची कृत्या । सत्यसत्य श्रीपूज्यस्वामी ॥ २०९ ॥ मम पूर्वजन्म भूमिया । सांगितली जी स्वामिराया । आता कृपा करोनीया । पंचगुरूपाया नौकार तो ॥ २१० ॥ सर्वोत्कृष्ट नौकार मंत्र । गुरूमुखे घेऊनी स्वतंत्र | सदैव जपजाप्यसूत्र । नरदेह पवित्र जीव हा ॥२११ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy