SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 754
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग एक्कावन्नावा : ७२९ 1 राय ऐकताची त्वरे । क्रोध धडके वैश्वानर । सैन्य करोनिया सादर | ग्राम सत्वर वेष्टिला तो ॥ १६४ ॥ दोघे झुंजती धीर वीर । सैन्य मिळाले ते अपार । धनुर्विद्याते बाणयंत्र । वीरासी वीर नाटोपती ॥ १६५ ॥ तेव्हा तो करकंडु बळवंत । शत्रु जिंकिला तो क्षणात । पळता धरोनिया त्यात । कोप हृदयात दाटला ॥१६६॥ दोहि बाहि तो क्षितितळी । पाडोनी बैसला उरस्थळी । गुडघा दिला कंठनाळि । सव्यपद भालि मुकुटी ॥ १६७॥ क्रोधे रगडू पाहे त्यासी । तेथे देखिले जिनबिंबासी । मुकुट घेवोनी हस्तासी । रत्नबिंबासी नमस्कारी ॥ १६८ ॥ हा हा म्या महत् पाप केल । क्रोधांधेन पाप घडल । आपनिंदा पाप उडाले । राजा बोले अरेरे मूर्खा ॥ १६९ ॥ युद्धसमयी ही प्रतिमा । मुकुटी ठेवोनी अधमा । हिंसासमय नेनसीऽधमा । सप्तम नर्कधामा जाशील ।। १७० || क्षेमा धरोनिया अंतरे । उठि उठी रे मूर्खा त्वरे । कन्हत कुंथत दोही करे | चरणावर लोळतु ।।१७१ ।। त्या दोही कर उचलून । देता जाला अभयदान | त्याच राज्य त्याला देउन । केला स्वाधीन स्वसेवक ।। १७२ ।। सांगात घेवोनी तयासी । पाहती ग्राम रयतीसी । सुखी नांदावे पुत्रपौवासी । करभारासी देति प्रजा ||१७३ || देवपूजा श्रीगुरूभक्ती । षट्कर्म अस्त्र शास्त्रयुक्ती । सप्त क्षेत्र धन खचिती । शक्तीसार भक्ति करा भव्यै ॥ १७४॥ देश वन वोलांडिती ते । पुढे देखिले कुंतलदेशात । पुण्य क्षेत्र तेथ शोभत । वर्णिता मात बुद्धी थोडी ॥ १७५ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy