________________
प्रसंग एकावन्नावा । ७१७
झुगारिता अज्ञान मुग्ध । पुष्प बैसे युगळपद । पुण्य अगाध सुखबोध । उत्कृष्ट पद पुष्पपूजा ।।२१।। जै जै शब्द उच्चासनी । सर्वही गेले निजस्थानी । गोपाळ श्रेष्ठीया सदनी । हृदयभुवनी सर्वोत्कृष्ट ॥२२।। यानंतरे आनिक कथा । श्रवण करा महाश्रोता। श्रावस्ती नगरी आतौता । श्रेष्ठि वस्ता सागरदत्त ।।२३।। नागदत्ता तयाची भार्या । तरुण्यमदना वरे तया । विषयलंपट पापिया । सोमश्रमया ब्राह्मणासी ।।२४।। ऐसी स्त्रिया धर्मवंतासी । महाकष्ट दुःखाची रासी । काळी कर्कशा पतिद्वेषी । संसाराशी महातस्करी ।।२५।। तदा सागरदत्तवानी । परमार्थी तो धर्मध्यानी । स्त्रीचेष्टा देखोनी नयनी । वैराग्य मनी मोक्षमार्ग ।।२६।। दीक्षा घेवानिया त्वरित । तप पापक्षय करीत । आयुष्यांती स्वर्ग प्राप्त । सुख भोगित निर्जर तो ॥२७॥ येरीकडे अंगदेशात । चंपापुरी नगर त्यात । राजा बसुपाळ पुनीत । स्त्री विख्यात वसुमती ते ॥२८॥ दंतीवाहन पुत्र गुणी । तत् उदरी स्वर्गाहुनी । सागरदत्त जीव येवोनी । राजसदनी सुखी सर्व ।।२९।। सोमशर्मा पापी ब्राह्मण । कुगति दु:खात भोगून । कलिंगदेशी हत्ती होऊन । नर्मदास्थान पसुगती ॥३०।। कामदारे धरोनी त्यासी । घेवोनी आले चंपापुरीसी । वसुपाळ ठेविले त्यासी । कर्मयोगेसी स्थिरावला ॥३१॥ ते नागदत्ता मनोनिया । तामलिप्तिनगरीतिया । वसुदत्ता ते वणिप्रिया । नागदत्ता कन्या अभिदान ॥३२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org