________________
७०० : आराधना-कथाकोष इतुक कराल विवेक । तरी देई वो सत्वभाक । मम कन्या गुणाब्धिक । कुलदीपक सत् पुण्यशील ॥४५।। उग्रसेनेन तदा सर्व । जे जे सांगितले अपूर्व । अंगीकारी रहित गर्व । महा अपूर्व लग्नसोहळा ।।४६।। विधियुक्त पंचदिवस । तुर्यदान पान संतोष । वृषभसेना मनी हर्ष । राज्याधीश पुण्ययोगेन ।।४७।। राजवल्लभा पट्टराणी । संसारसुखाची ते खानी । अनर्घ्य रत्नाची ठेवणी । दिनरयणी सर्व सुख ।।४८।। तदा वृषभसेना बाळी । राजपदवी चाफेकळी । पूर्वपुण्य ते महाबळी । जीवा सांभाळी प्रयत्नेन ॥४९|| राजवल्लभा प्रियनारी । नित्यपूजा न्हवन करी । अष्टद्रव्य ते हेमपात्री । जिनमंदीरी महोछवे ॥५०।। महासाधुसी दानमान । चतुर्विध नवविधा पुण्य । करिती व्रतशीलपालन । जेन गमन स्वर्गमोक्ष ॥५१॥ रमण रमणी अति प्रीती । सामिया विनयवृत्ती । पूर्वपुण्य पुण्य जोडिती । मोक्षाची प्राप्ती व्हावयासी ॥५२॥ इत्यादिक पुण्यप्रभाव । भोग भोगिताती अपूर्व । नित्य नेम दर्शन सेव । श्रवण कराव सिद्धान्तसूत्र ॥५३॥ ऐशा परी पुण्याची कीर्ती । उग्रसेन वृषभसेना सती । जगी प्रकाशरूप कीर्ती । देशदेशाप्रति आश्चर्य ।।५४।। कासी देश वाराणसीत । पृथ्वीचंद्र राजा मिथ्यात । दुष्टबुधी परस्त्रीरत । जंतु पसुत अशक्त तो ॥५५॥ वृषभसेना उग्रसेन । रूपकीर्ती दुष्ट ऐकोन । हृदयी कपट धरोन । बोलावी प्रधान सांगे त्यासी ॥५६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org