SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 702
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग अठेचाळीसावा : ६७७ वसुमित्र यौवनभर । दुगडभोग सर्वरात्र । दिन पेटारी कष्ट गात्र । दिव्यनर रात्री होतसे ।।२७७।। दोही पक्षी ते सदासर्वदा । काही सौख्य किती आपदा । सुपुण्यविना भवबाधा । न चुके कदा स्वामिराया ।।२७८।। म्हणोन त्याहाच्या हितासी । ते असोत विष्णुपुरिसी। त्याच्या कुश्चळशरीरासी । संस्कार अग्नीसी योजिला ॥२७९।। ते ऐकोनिया महीनाथ । धर्मयुक्ती न कळे त्यात । मौन धरोनी हृदयात । मिथ्यामती ॥२८०|| एके दिनी वनक्रीडेला । निविड वनी प्रवेशला । तेथ मुनीश्वर देखिला । तपस्वी भला सूर्यासम ।।२८१॥ तो यशोधर महामुनी । रायासी क्रोध आला मनी । हा राणीचा गुरू म्हणोनी । कुतरी त्यानी चेतविली ॥२८२।। पंचशत श्वानाचा मेळा । मुनीसमीप क्रोधलीळा । प्रदक्षिणा देती सकळा । बैसले जवळ कर्कर ॥२८३।। तयाचे महात्म्ये करूनी । वैरभाव नसे मनी । बैसले स्तब्ध ते नयनी । ते पाहोनी तप्त नरेंद्र ।।२८४।। क्रोधे बाण लाविला सीति । बाणामागे बाण सोडिती । पुष्पमाळा गळा पडती । पुण्य वणिती मुनीचे कोण ॥२८५।। त्याच समयी गतिबंध । सप्तमनीचा निबंध । त्रितीससागरवर्षाब्ध । महत् बंध भूरिकष्टदायी ॥२८६।। तत् मुनिपादांबुजेन । सद्गुरूचे दर्शन करून । दर्शनेन पापनाशन । जाहला क्षीण नरकायु ।।२८७।। पुण्यवान तो महामुनी । यशोधर तपस्वी ज्ञानी । तयाचे मुखे जिनवानी । सम्यक्त्व मनी उपशम ॥२८८॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy