SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 679
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६५४ ! आराधना-कथाकोष अवंती देश तो विख्यात । उज्जनी नगरी असे त्यात । धर्मपाळ राजा धर्मवंत । धर्मस्त्री रूपवंत गुणी ॥८॥ सागरदत्त तेथे असे । सुभद्रा स्त्री रोहिणी भासे । नागदत्त पुन तयास । जिनपदी भासे भ्रमर पै ।।९।। तथा समुद्रदत्त गुणी । शीलवंत स्त्रिया रूपिणी । तया उभयता पासोनी । कन्या सगुणी प्रियंगा ते ॥१०॥ तेव्हा त्या श्रीनागदत्तान । प्रियंगा परणीली विधीन । कुळधर्मपूजादि दान । पंचदिन तेतृस संघ ॥११॥ तथा ते दोघ सर्व सुखी । कोन्ही पापी विषयदुखी । प्रियंगा भोग इच्छा शेखी । कपटी मुखी वैर धरी ।।१२।। एकदा येवोन गहासी । संधी पाहे मित्रत्व त्यासी । नागदत्त व्रत उपौसी । कायोत्सर्गेसी अचळ तो ॥१३॥ धर्मानुराग तो संयुक्त । श्रीमत् जैनालय तिष्ठत । ते पाहोनी कुबुधी धृत । तत् पदी ठेवीत रत्नहार ।।१४।। चोर चोर करी पुत्कार । पापी इच्छा भोग आंतर । तराळे पाहोनी सत्वर । रायासी खबर सांगुतसे ।।१५।। क्रोधे राजा तराळा बोले । त्यासी मारा एक वेळे । दुष्टानी स्मशानासी नेले । खड्ग उपसिले सीर छेदु ।।१६।। घाव घातला मूर्नीवरी । तत् पुण्याचा उद्योत भारी । गळा शोभे रत्नसरी । प्रकाशभारी रत्नहार ॥१७॥ इंद्रासन कंपित जाले । विमानी बैसोनिया आले । नागदत्तासी बसविले । सिंहासन केले पुष्पवृष्टी ॥१८॥ स्तुती करिती इंद्रदेव । वाद्ये वाजताती अपूर्व । साधु साधु म्हणती सर्व । राव अपूर्व पाहे दृष्टीन ।।१९।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy