________________
प्रसंग शेहेचाळीसावा : ६२९ महासुपात्रा दान केल । त्यानी सर्व सुख मेळविल । नरदेहाच सार्थक जाल । श्रोते हो ऐस केल पाहिजे ॥१३३।। तेव्हा कोन्हे एके दिवसी । मुनीश्वर आले पारण्यासी । नवविध पुण्याची रासी । जोडोनी त्यासी पृच्छा करी ।।१३४।। अहो श्रीपूज्य जगदेश । निळधी जाली शरीरास । आहात की सुखसंतोष । सांगावे आम्हास गुरूवर्या ॥१३५।। ते ऐकोन गुरू वदती । कुकर्म दुःख भोगविती । सुकर्म सुख होय प्राप्ती । करिता भक्ति जिनपदी ।।१३६॥ ते ऐकोनिया चक्रधर । निर्मळ मुनी वाक्योत्तर । पुनः पुनः कृत नमस्कार । प्रशंसा थोर करीतसे ।।१३७।। सन्निध होता वैद्य अज्ञानी । जीवकाख्य नामाभिधानी । तो म्हणतसे मम करणी । व्यर्थ मुनीनी गमावली ॥१३८॥ जरी घेता हा माझे नाव । पावन होता कृष्णदेव । काही देता आम्हासी द्रव्य । बाबानी सर्व ममानहित ॥१३९।। निंदा मुनीची करिता जाला । आर्तध्यानी मृत्य पावला । नर्मदातीरी जन्म पावला । वानर जाला तिर्यंच पै ।।१४०।। मूढप्राणी ते जानती । स्वामिची निंदा करिताती । निंदे कुयोनी जन्म घेती । चौयांशी भोगिती गुरूद्रोही ।।१४१।। एकदा तो वनी वानर । वृक्षातळी पाहे मुनीश्वर । त्यास स्मरण पूर्ववैर । उपद्रव थोर करीतसे ।।१४२।। पद्मासनी ते मुनीराय । वृक्षशाखा घालिती घाय । छिन्न भिन्न जालीसे काय । सोसी परीषह द्विविस ।।१४३॥ मुनींद्र निश्चल देखोन । वानरा जाल जातिस्मरण । वैर फिटल्या शुद्ध मन । पूर्वज्ञान त्यास जाहले ॥१४४।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org