________________
प्रसंग शेहेचाळीसावा : ६२३ लोक-तस्मात् श्रीजिनभाषितं शुभतरं कीर्तिप्रमोदप्रदं । निं ज्ञानधनविशुद्धचरणैः सद्भिः सदा सेवितं । क्त्या भक्तिभरेण निर्मलधियो भव्या भजति अत्र ये। षां सारसुखं प्रबोधविलसत् श्रीसंभवं संभवेत् ।।६६।।
कथा ।।९४॥ लोक-विशुद्ध केवळज्ञानं नत्वा श्रीमजिनेश्वरं । यंजनार्थप्रहीणस्य वक्षे तस्य कथानकं ।।६७।। कुरूजांगल देश थोर । त्यात ते हस्तिनागपुर । तत् महापद्म नृपवर । धर्मी तत्पर षट्कर्मी ॥६८॥
याची स्त्री पद्मावती । रूपलावण्य गुणवंती। श्रीजिनेंद्र धर्म करिती । शीलवती षड्गुणभार्या ।।६९।। तथा त्या सुरम्य देशात । पोदनापुर ते विख्यात । सिंहनंदी तो महीनाथ । रायासी न देत करभार ।।७।। पद्मराजा पोदनपुरा । वेढा घातला त्या नगरा । तेथे बागात जिनमंदिरा । पाहोनी नेत्रा संतोषला ॥७१।। सहस्रकूट चैताळ तेथे । सहस्र स्तंभ मनोज्ञ त्यात । श्री जिनबिंब वेंदिवरौत । रत्नमय ते अनुपम ॥७२॥ नृप पाहोनिया अंतरी । हर्ष निश्चय त्रिप्रकारी। त्रिःपरीत्य जय उच्चारी । नमन करी साष्टांग पै ॥७३॥ अनुपम चैत्याले पाहोनी । विचार करी अंतःकरणी । आपुले ग्रामासी जावोनी । करउ भवनी सहस्रस्तंभ ।।७४।। ऐसे विचारोनी मानसी । पत्रिका लिहिली ग्रामासी । सहस्रस्तंभ सायासेसी । महाप्रयत्नेसी ठेवावे तम्ही ।।१५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org