________________
६२० । आराधना - कथाकोष
वीरसेन राजगृहासी । पुत्राध्ययन करायासी । पत्र लेहुन स्वकरेसी । चतुरनरासी पाठविले ॥३१॥ पत्र वाचिता ज्ञानवंत । ध्यायन करावे सिंहसुत । आकारहीन अर्थानर्थ । आळशाअर्थ व्यंजनहीन ||३२|| अपमत्त तर्कपणेन । अर्थ लाविला ज्ञानियान । सिंहपुत्रासी राजकारण । सिकवावे बैसोन समीप ||३३|| तेव्हा राजा स्वल्पदिवसा । येता जाला स्व आवासा । राजनीती पाहे मनसा । ज्ञान ससा पुत्रासी नसे ||३४|| बोलावुनी पुत्र रानीसी । अध्ययन किं न करिसी । आम्ही पाठविले पत्रासी । त्या पाठासी कारण केले ||३५|| राव पिता पाहोनी क्रोधाग्नि । पुत्र वदे विनयवानी बापा पत्र अर्थं पाहोनी । केली करनी वाचकाज्ञेन ३६ ॥ पाचारोनिया वाचकात | पत्रार्थं विचारिला त्यात । अनर्थ पाहोन भयाभीत । धरी मौनात अधोवदन ||३७|| मानभंग जाला तयाचा । रायदंड केला मूर्खाचा | यालागी ज्ञानिय अर्थाचा | अळसक्षर व्यंजनाचा नसो ||३८|| श्लोक : - यथौषधं हीनगुणत्वमाश्रितं निहंति नैवाऽतशरीरवेदनां । तथाक्षरे हीनगुणाश्रितं शुभं हितं न तत् शुभं सुधीः पठत् ||३९| यथा वैद्य औषध देत । पथ्य न सांगे रोगीयात । शरीरवेदना होत त्यात । तेवि ज्ञात्यात अर्थाऽनर्थ ||४०|| पंडित ऐसे न करावे | अळसविना शास्त्र पढावे | व्यंजनाक्षर न चुकावे । पढने पढावे शुद्धाक्षर ॥४१॥ कथा ति हान्नव संपूर्ण । पुढिल कथेसी सावधान | अर्थहीन ज्ञान सांगन । ते निरोपन श्रुत करा ॥४२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org