SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 637
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६१२ : आराधना-कथाकोष तदा विद्यारूप चांडाळ । प्रकट चर्म घे तत्काळ । नदी उपरि धूतवेळ । फपिस बंबाळ कुतपस्या ।।१३१॥ गंगाजळ दुर्गंध येता । क्रोध आला त्या भागवता । अरेरे नष्टा अपवित्रा । दुगंधता त्वा केला सर्व ।।१३२।। महाश्रमी होऊनी तेथ । गेला उपरी डोहात । कुविद्ये जाप करी तेथे। मिथ्यति तयात प्रशंसिती ।।१३३।। पुनः परीक्षा पहावयासी । देवता विद्या दुर्गंधासी। करिता पुनरपि तयासी । क्षीद तो मानसी जाहला ।।१४४।। तेथे देखोनि आश्चर्य । म्हणे पाहीन याची सोय । जळ जपत तत् समय । टाकोन बाह्ये निघाला ।।१३५।। तेथे राजा राणी समूळ । वनक्रीडा खेळती खेळ । हिंदोळादि नभमंडळ । सुविद्याबळ विनोदक्रीडा ॥१३६।। विद्याधर बैसे विमानी । क्रीडा करी नभ गगनी । विष्णुभक्त पाहे नयनी । धरी मनी विद्यालोभ तो ।।१३७।। त्या वनी होता तो चांडाळ । तोहि दाखवी विद्याबळ । विद्याभिलाषी सकळ । उच नीच कुळ न जानती ॥१३८।। तदा तो लोभी भागवत । मातंगासी लावी तो प्रीत । म्हणे हे विद्या सांगा मात । आश्चर्यात पाहिला म्या ॥१३९।। ते ऐकोनिया मातंग । म्हणे तुम्ही ब्राम्हण चांग । तुम्हा मुखी वेदवेदांग । आम्ही हीनांग नीचकुळी ।।१४०।। तुम्ही जानता सर्वशास्त्र । सदा सोवळ काया पवित्र । गुरूविनयविना मंत्र । विद्या पवित्र कैसी लाभे ।।१४१।। गुरूसी नमन पूजन । तन मन आनि धन । विश्वासे गुरूसी अर्पण । तेव्हा प्रसन्न गुरूराज ॥१४२।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy