SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 586
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग त्रेचाळीसावा ! ५६१ त्यासी घेवोनिया त्वरित । आनिला रायाचे सभेत । राये पाहोनिया त्यात । कुरूप अनाथ दिसतो ।।९।। नृप म्हणे नोव्हे तस्कर । तराळ म्हणे हाहि चोर । चौदावे रत्न यासि त्वर । दाखविता वग्त्र कबुल ॥१०॥ तेव्हा त्यात कोतवालान । माघ मास सीत अग्नीन । तापन ताडन बंधन । भय उत्पन्न बत्तीसादी ॥११॥ कबूल हो रे रायापासी । चोर नोव्हे मी गुणरासी । छिन्न भिन्न जाले त्या अंगासी । राये त्यासी बोलावी त्वरे ॥१२॥ राजा वदे अरेरे चोरा । तो म्हणे मी सावच खरा । देहे दंडिला तुम्ही बरा । आनिक करा मनइच्छेन ।।१३।। यमदंड जाला लज्जित । नृप वदे त्या तस्करात । अभयदान दिल्हे तूत । सत्यासत्य सांगावे त्वया ।।१४।। ते ऐकोन नृपवचन । विद्युत्चर निर्भय मन । मी चोर सत्यच प्रमाण । तराळवचन सत्य सत्य ॥१५।। तेव्हा तो राजा वामरथ । विस्मय करी हृदयात । बत्तीस परी दंद तूत । सोसिले समस्त कैसे त्वा ।।१६।। चोर म्हणे ऐकावे राया। मनीपासी ऐकिल मया । महान् दुःख नर्क ठाया । जावोनीया भोगावे तेथे ॥१७॥ जन्म घेवोनिया पुढती । दुःख सोसावे नरकगती। म्हणोन क्षमा धरिली चित्ती । गुरुवचनोक्ती सखया ॥१८॥ ऐकोनी तयाचे वचन । रायाचे द्रवले अंतःकरण । होवोनी प्रसन्न वदन । भाग देईन मनइच्छित ॥१९॥ विद्युच्चर म्हणे नृपति । अभय द्यावे वरदहस्ती । मम मित्र यमदंडाप्रति । देवोन स्वस्तीक्षेम ठेवा ॥२०॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy