SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 552
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग अडतीसावा : ५२७ प्रौढ झाला दिवसमासी । पिता पाहोनिया पुत्रासी । श्रेष्ठीपद देवोनिया त्यासी । मुनीपासी दीक्षा घेतली ॥ १७२ ॥ पूर्वपुण्य करोनिया । नवयौवन पावोनिया । पणिल्या कुळवंत स्त्रिया । रूपवंत जाया षड्गुणी ॥१७३॥ बत्तीस स्त्रियांचे सांगात । भोग भोगी मनइच्छित । न जानेचि दिवसरात । संसारात निमग्न जाला || १७४॥ यशोभद्रा ते तयाचि माय । मोह धरी पुत्राचा हे स्नेहे । मुनी वाणी धरी हृदय । करी उपाय पुत्रासी ते ॥ १७५ ॥ मुनीदर्शन तपा जाईल । म्हणोनी त्या रक्षण केल । भावरीपुण्य आंतरल । स्त्रियांचे बोल अनहित ॥ १७६ ॥ कित्येक दिवसाउपरी । उज्जेनीचा एक व्यापारी । तथा राजगृहनगरी । रोजगारी रत्नकांबळे ॥ १७७॥ ते रायासी दाखविले | दोन चौकड्या अमोल | कलाबुती हीरे जडले । मागितले मोल मिळेना ॥ १७८ ॥ कोन्ही सावकार न दिसे तेथे । भ्रमण करी तो ग्रामाते । हवेली देखिली उन्नत । बैसला तेथे चिंतातुर ॥ १७९॥ म्हणे एवढे थोर थोर । दिसतात हे सावकार । कोन्ही न घे द्विष्टचीर । राजादी सारे द्रव्यहीन ॥ १८०॥ तेथे ते यशोभद्राबाई । म्हणे बा बोलतासि काइ । एक बोझ अनल नाही । द्विजाष्ट काई पूरतील ॥ १८९॥ मम स्नुषा बत्तीस | मज सुद्धा दादा त्रीतीस | रुसतील एकमेकास । हे तो षोडश आंगवस्त्र || १८२|| सौदागरासी बोलाऊन । मोल वस्त्राचे घे पाहोन । गनती करोन एक सिक्का | ... ॥१८३॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy