SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 546
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग अडतीसावा : ५२१ शिष्य पुसे अहो गुरूराया । सूर्यमित्र हे कीतिराया। हा जीव दुष्ट तो पापिया। याचि काया हे अपवित्र ॥१०॥ याने काय पापात केले । ते सांगावे स्वामि वहिले । ते ऐकोनि गुरू बोलले । अवघि पाहिले ज्ञाननेत्रे ॥१०१।। तुझा भाऊ वायुभूती । मुनिनिंदा पाप भोगिती । प्रथम कूष्टि मृत्युप्राप्ती । पापे होती ते गर्दभी ॥१०२॥ मरोनी जन्मली डुकरी । तेथे मृत्यु मग कूतरी। तेथोन चांडाळाचे घरी । जाली कुवरी ते पापी जीव ।।१०३।। मातंग टाकिली वनात । तो जीव हा भोगी पापात । ते तयेसी जाल शृत्य । जातिस्मरणात जाल तियसी ।।१०४।। शरण शरण गुरूराया । तुम्ही तारक षटकाया । मजवर करावी दया । सांगा उपाया कर्मक्षयासी ॥१०५॥ मुनेश्वर कृपा करोनी । पंचाणुव्रत तिसी देवोनी । व्रतफळे पापाची हानी । चंपापुर भुवनी जन्मली ॥१०६॥ पुरोहित तो द्विजोत्तम । पुत्री नागश्री उत्तमोत्तम । द्वादशवरुषे स्वस्थधाम । सुखी क्षेम नांदताती ते ।।१०७॥ एके दिवसी उद्यानवनी । श्रेष्ठी मंत्री कन्या मिळोनी । नाग पूजावया लागोनी । वनभुवनी दोघी आल्या ॥१०८॥ पूजा करोनी वनसंपति । सख्यासहित पाहताती। तत्समयी देखिले जती । अग्निभूती तो सूर्यमित्र ॥१०९॥ नागस्त्रियन त्या पाहोन । केले पंचांग त्या नमन । सन्मुख बैसल्या जावोन । पूर्वस्नेहान प्रीती मानसी ॥११०॥ शीषे वदे जी गुरूराया। मम मानसी स्नेहमाया । उद्भवली या नागस्त्रिया । कृपा करोनिया सांगावे ॥११॥ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org Jain Education International
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy