SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 535
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५१० : आराधना कथाकोष चरणी ठेवोनी मस्तक । दीक्षा द्यावी भवतारक । मस्तकी ठेवोनी हस्तक । सुखदायक मोक्षमार्ग ॥ १४७ ॥ गुरूराय कृपा केली । विधियुक्त दीक्षा दिधली । सर्व क्रिया त्या सांगितली । विद्या घोकली सगरकीर्तने ।। १४८ ॥ तदा तो खगेंद्र त्वरित । कैलासगिरीवरी जात । सगरपुत्र ते समस्त । त्या दाखवीत मायामृत्यु || १४९ ॥ अहो पुत्र तुमची वार्ता | ऐकोनिया तुमचा पिता । दीक्षा घेवोन वनातौता । तप करिता जाला तो ॥ १५० ॥ ते सांगावया तुम्हासी । क्षणभंगुर या देहासी । तुम्ही करावे आत्महितासी । जेन चौन्यांशी दूर होय ।। १५१ ।। ते ऐकोन हितवचन । साठ सहस्र बंधुजन । संसृति विरक्त होऊन । दीक्षा घेवोन तप करिती ॥ १५२ ॥ भगीरथासी नृत्यजाले । पितापुत्र स्वहित केले । अवडंबरे दर्शना आले । मुनी वंदिले यथायुक्ती ।। १५३ ॥ धर्मवृद्धी धर्म कथा | ऐकताति स्वहितार्था । श्रावकधर्म भगीरथा । सप्ततत्त्वार्था श्रवण केले || १५४।। तदा तो मणिकेतु देव | प्रकट रूप दाखवी भाव । सगरकीर्ति मुनीराव । नमिला भाव त्रिकरणेसी ॥ १५५ ॥ तप दृढ करावयासी । विनय करी सद्गुरूपासी । क्षमा करावी स्वामी मजसी । म्या तुम्हासी छेडिले फार ।। १५६ ॥ तो अपराध करावा क्षमा । आशीर्वाद द्यावा अधमा । स्वामी म्हणे उत्तमोत्तमा । उपकार आम्हा तुम्ही केला ॥ १५७॥ तुम्ही पूर्व मैत्र आम्हात । धर्मे तुम्हासी स्वर्ग प्राप्त । आम्ही बुडता भवसागरात । उपदेश हस्त काढिले ॥ १५८ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy