SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 533
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५०८ । आराधना कथाकोष भरतेश चक्रवर्तीन । पुण्य केले पूर्वजान । तैसेच मम इच्छितमन । पुण्याचे कारण तुम्ही करा ॥१२३।। भगीरथादि पुत्र सर्व । सप्तक्षेत्री द्रव्य खर्चाव । जन्म सार्थक कराव। पुण्य जोडावे कीर्तिवंत ॥१२४॥ भूपतीवाक्य ऐकोनिया । वचन नुल्लंघेचि तया । नमन मौन धरोनिया । आशंका हृदया स्वस्थते ॥१२५।। तथा ते पुत्रपरिवार । पित्यासी करोनी नमस्कार । म्हणे काय इच्छा अंतर । सांगावे प्रकर दयानिधी ॥१२६।। प्रतिज्ञावचन द्यावे मजसी । तेव्हाच करीन भोजनासी । सर्वही दिधले भाकेसी । सांगे आम्हासी हितकार्य ॥१२७|| अहो पुत्रा तुम्ही करन । धर्मकार्य मनी धरोन । कैलासगिरिसी जावोम । पूजाविधान विधियुक्त ॥१२८॥ श्रीमत् चक्री भरतेश्वर । चतुर्विंशति तीर्थंकर । रत्नमय बिंबप्रकर । जिनागार सुवर्णाचे ॥१२९॥ पुढति पंचमकाळात । होतील पापाचे पर्वत । पुण्यविना दरिद्रप्राप्त । देवगुरूत न जानती ॥१३०॥ सर्वही नेतील सुवर्ण । यासाठी करावा प्रयत्न । कैलासगिरिसी जावोन । योजनप्रमाण सोपानीक ||१३१॥ अष्टापद तो गिरिवर । खातिका तैसीच चौफेर । गंगानदी महादुस्तर । भयंकर भूचे रानराशी ॥१३२॥ भगीरथादी सर्वबंधू । महायोद्धे प्रतापसिंधू । सर्वासी मान्य उपदेश बोधू । महा अगाधु पुण्यकार्य ॥१३३॥ परमानंद त्या मानसी । घेवोन सर्व सामग्रीसी। गेले कैलास गिरिपासी । करी सायासी अष्टपद ॥१३४॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy