SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 525
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५०० । आराधना कथाकोष एकदा तो श्री नेमिनाथ । जगत्पूज्य दयाब्धिवंत । समवशरणी ज्ञानवंत । ऋद्धिवंत द्वादशसभा ||३०|| यादव सर्वही मिळोन । गिरिनारी श्री नेमीजिन । अष्टविध पूजा करोन । नवविधा पुण्य जोडिती ॥ ३१ ॥ धर्मश्रवण यथास्थित । यादव ऐकती समस्त । मग पृच्छा करिती देवात । त्रिजगन्नाथ ऐका स्वामी ||३२|| द्वारकाराज्य श्रीकृष्णासी । आयु किती द्वारकेसी । किंवा चिरकाळ अक्षयेसी । सांगा आम्हासी गुरूराया ||३३|| द्वादशवर्षेपर्यंत | यादव नांदती समस्त । मद्यपान क्षय होय त्यात । जिनवानी सत्य संशय नाही ||३४|| द्वारावतीचे दहन | द्वीपायन मुनी येवोन । जरत्कुमाराचे हातोन । हरिमरण वनवासी ||३५|| ते ऐकोनी वासुदेव । मद्यघट घेवोनी सर्व । उजंतगिरी टाकी बरवे । मरण उपाव करिताती ॥३६॥ द्वीपायन मुनी मनी भ्याला । पूर्वदिशी दूरंतर गेला । होणार कर्म न चुके त्याला । मूढचित्ताला न जानती ॥३७॥ बळिभद्र हातच शस्त्र । नारायण मरण यंत्र । ते बाळदेव घासोनी सर्वत्र । उरल तंत्र अब्धिक्षिप्त ॥ ३८॥ ते झगमगीत जळात । भक्ष्य म्हणोन मत्स्ये गिळीत । धीवरा मच्छे जाला प्राप्त । देखिले उदरात बाणफळ ॥३९॥ जरत्कुमार ते घेवोनी । लावी नेमस्त बाणमूर्नी । भाताडा बाण ठेवोनी । पारधी वनी पापकर्मिया ||४० ॥ तेव्हा द्वादशवर्ष जाली । धोंडमासाची भूल पडली । द्वीपायना बुद्धी सुचली । द्वारका पाहिली पाहिजे ॥४१॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy