SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 506
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ प्रसंग छत्तीसावा : ४८१ वासुदेवाचे पदांगुष्ट । लाविता उघडली कपाट । यमुना नदी भरोनी पाट । दिधली वाट पूर्वपुण्य ॥१७५॥ गोकुळाबाहेर यक्षदेवी । घुमारि तेथे असे लाघवी । नंद यशोदा पुत्र भावी । भाक द्यावि देवता माय ॥१७६!। पुत्र होईल जे तुजसी । अनुक्रमे कन्या जालि तिसी । क्रोधे बोलाविले धवासी । देवतेपासी कन्या टाका ॥१७७॥ नंद आला कन्या घेवोन । देवतेसी बोले क्रोधान । पुत्र नाही मज कारण । तुझे वचन असत्य जाले ॥१७८।। वसुदेव मनी समजला । पुत्र देवीपुढे ठेवला । कन्या घेवोनी निघता जाला । तव बोलला घुमारी तो ॥१७९॥ पुत्र घेई नंद गोवळा । देइ देइ यशोदे बाळा । पुत्र पाहोनी नेत्रयुगुळा । हृदयकमळा संतुष्ट ॥१८०॥ त्वरा येवोनिया गहासी । पुत्र दिधला यशोदेसी। येरीकडे मथुरेवासी । वसुदेव गृहासी स्वस्थ ॥१८१।। रक्षपाळ जाले जागृत । कंसासी जानविती मात । पापी धावला तो त्वरित । सप्तम बाळा घातावया ॥१८२॥ देवकी वदे करुण वचन । एक राहू दे माय बहीण । नको रे वधू कन्यारत्न । पाप दारुण बंधुराया ॥१८३॥ बापा मी पसरिते पदर । जीवदान देइ रे सहोदर । विनवीतसे जोडोनी कर । पदी नमस्कार करीते मी ॥१८४।। दुष्टबुद्धी पापी निर्दय । कन्या ही रति लीहस्तद्वय । वदन पाहे कंसराय । सुंदरतनये रूपवंती ।। १८५ ॥ कंसान मनी विचारील । ईसी भ्रतार जो होईल । तोच माझ वैर साधील । कोन्ही न वरील तैस करू ॥१८६।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy